नवी दिल्ली ः मुलीच्या जन्मानंतर अनुष्का शर्मा बॉलीवूड आणि ग्लॅमर इंडस्ट्रीपासून दूरच आहे. कधी विराट कोहलीसोबत डिनर डेट, तर कधी वामिकासोबत मौजमस्ती करतानाचे फोटो ती शेअर करत असते. दीर्घ कालावधीनंतर अनुष्काने एक बोल्ड फोटो शेअर केला आहे.
अनुष्काने इन्स्टाग्रामवर आपली मोनोकिनी पोझ फ्लांट केली आहे. ऑरेंज कलरच्या मोनोकिनीला परफेक्ट बनविण्यासाठी तिने श्रगपण परिधान केले आहे. याशिवाय किनार्यावर उन्हापासून बचाव करण्यासाठी हॅटसुद्धा घातली आहे. सध्या हे बोल्ड छायाचित्र वेगाने व्हायरल होत आहे. अनुष्का सध्या पती विराट व मुलगी वामिकासोबत मालदीवमध्ये सुट्टीवर आहे.