सांगली : विवाहितेचा छळ; पाच जणांवर गुन्हा दाखल

सांगली : विवाहितेचा छळ; पाच जणांवर गुन्हा दाखल
Published on
Updated on

सांगली; पुढारी वृत्तसेवा : गाडी घेण्यासाठी माहेरुन दहा लाख रुपये आणण्याचा तगादा लावून विविध कारणांनी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासू, सासरे आणि नणंदेवर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पीडित महिलेने फिर्याद दिली आहे.

पती शकील जैनुद्दीन मुल्ला (वय 30), सासू बेबीजान जैनुद्दीन मुल्ला, सासरे जैनुद्दीन शमशुद्दीन मुल्ला (वय 57, तिघे रा. शेणोली, ता. कराड), नणंद शबाना रियाज मुल्ला (वय 38, रा. मसूद माले, ता. पन्हाळा), नणंद रिजवाना अमानुल्ला पटेल (वय 36, रा. हिंगणगाव, ता. कडेगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. दि. 27 जानेवारी 2019 पासून ते आजपर्यंत शेणोली, सातारा व बुधगाव येथे हा प्रकार घडला.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित विवाहितेचे माहेर बुधगाव असून शेणोली येथील शकील मुल्ला याच्यासोबत तिचा विवाह झाला. विवाहानंतर सासरच्या लोकांनी विवाहितेस तुला स्वयंपाक नीट करता येत नाही, असे म्हणून तिला शिवीगाळ करुन वारंवार शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. तसेच गाडी घेण्यासाठी माहेरुन दहा लाख रुपये आणण्याचा तगादा तिच्याकडे लावला होता. विवाहितेच्या आई-वडिलांनी घातलेले सर्व दागिने सासरच्या लोकांनी काढून घेतले. याबाबत पीडित विवाहितेने सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news