लेडी गागाने अडीच मिनिटांत ९ वेळा बदलला ड्रेस (video)   | पुढारी

लेडी गागाने अडीच मिनिटांत ९ वेळा बदलला ड्रेस (video)  

वाशिंग्टन (अमेरिका) : पुढारी ऑनलाईन 

कोरोनाच्या संकट काळात अमेरिकेत अध्यक्ष पदासाठी मतदान होत आहे. यामुळे अमेरिकन नागरिकांना येत्या काळात नवा अध्यक्ष मिळणार आहे. याच दरम्यान प्रसिद्ध गायक आणि अभिनेता लेडी गागाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये लेडीने अमेरिकन नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.  

लेडी गागाने याबाबतचा अडीच मिनिटांच्या व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यात तिने आपल्या खास शैलीत अमेरिकन नागरिकांना मत देण्याचे आवाहन केले आहे. तसेच तिने जे नागरिक मतदान करून आले आहेत त्याचे आभार ही मानले आहे. यापुढे जावून लेडीने जे नागरिक मतदानावर बहिष्कार टाकतात, त्यांनाही आवर्जुन मतदान कारावे. तो आपला जन्मसिद्ध हक्क असल्याचे ही सांगितले आहे. 

अधिक वाचा : लग्नानंतर काजल अग्रवालचं रोमॉटिक फोटोशूट  

परंतु यातील आणखी एका गोष्टीने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. यात लेडी गागाने एक- दोन नाही तर चक्क नऊ वेळा आपला ड्रेस बदलला आहे. तसेच प्रत्येक वेळी वेगवेगळ्या लूकमध्ये दिसली आहे.  लेडीचा हा लूक चाहत्यांना खूपच आवडला आहे.   

अधिक वाचा : ड्रग्ज प्रकरणानंतर सारा अली खान पुन्हा चर्चेत

लेडी गागा नेहमी सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असते. विशेष म्हणजे, पॉप स्टार लेडी गागा तिच्या अभिनयाबरोबरच वेगवेगळ्या स्टाईलसाठीही ओळखली जाते. लेडी गागाने अनेक चित्रपटांत आपल्या सुमधूर आवाजाने गाणी गायिली आहेत. 

(video: Lady Gaga twitter वरून साभार)

 

Back to top button