‘आम्ही चित्रपटसृष्टीत मनोरंजन करण्यासाठी, द्वेष आणि नकारात्मकता पसरवण्यासाठी नाही’ | पुढारी

'आम्ही चित्रपटसृष्टीत मनोरंजन करण्यासाठी, द्वेष आणि नकारात्मकता पसरवण्यासाठी नाही'

मुंबई : पुढारी ऑनलाईन

अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) यांच्या निधनानंतर हिंदी चित्रपटसृष्टीची प्रतिमा ज्या प्रकारे खराब होत आहे, त्यामुळे आपल्याला खूप दु:ख होत असल्याचे अभिनेत्री करिना कपूर (Kareena Kapoor) ने म्हटले आहे. तसेच चित्रपटसृष्टीबद्दल ज्या प्रकारची असंवेदनशीलता दाखवली जात आहे, ते त्रासदायक असल्याचे एका कार्यक्रमादरम्यान करिना कपूरने म्हटले आहे.

तसेच करिना कपूर म्हणाली की, तुमचा विश्वास असो वा नसो, इंडस्ट्रीला लक्ष्य केले जात आहे. काही बोलल्यास तुमच्यावर टीका होईल आणि नाही बोलला तरीही तुम्हाला लक्ष्य केले जाईल. तर कोणत्याही विषयावर त्यांचे मत कलाकारांनी मांडले तर त्यांना ट्रोल केले जात होते. याच कारणाने आम्ही शांत राहणे पसंत केल्याचे करिना कपूर (Kareena Kapoor) म्हणाली.  

त्याचबरोबर करिना कपूर म्हणाली की, कलाकारांना बोलायचे नसेल याचा अर्थ प्राप्त असा होतो की त्यांना विनाकारण ट्रोल केले जात आहे. हे येथे दिसून येत आहे. ते खरंच करमणूक उद्योगात तिरस्कार आणि नकारात्मकता पसरवत आहेत. आम्ही आमच्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी येथे आहोत. आम्ही येथे द्वेष आणि नकारात्मकता पसरवण्यासाठी नाही.

Back to top button