मुंबई : पुढारी ऑनलाईन
कॉमेडियन कपिल शर्माला मुंबई क्राईम ब्रॅँचने समन्स पाठवले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, चौकशीसाठी त्य़ाला हजर राहण्यास सांगितलं आहे. कार डिझायनर दिलीप छाब्रियाने केलेल्या फसवणूक प्रकरणात कपिलची चौकशी केली जाणार आहे.
अधिक वाचा – अभिज्ञा भावे अडकली विवाह बंधनात (photos)
कपिल शर्माने कार डिझायनर दिलीप छाब्रियाच्या विरोधात फसवणूक केल्या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. आता त्याला साक्षीदार म्हणून त्याचा जबाब नोंदवण्यासाठी क्राईम ब्रँचने बोलावलं आहे. दिलीप छाब्रिया भारतातील प्रसिद्ध कार डिझायनर आहेत. दिलीप यांनी भारतातील स्पोर्ट्स कार डिझाईन केली होती. त्यांनी अमिताभ बच्चनपासून ते शाहरुख खानपर्यंत अनेक सेलेब्सची कार डिझाईन केली आहे.
वाचा – आर्ची बदलली; वर्कआऊटचा फोटो व्हायरल
मागील वर्षी २८ डिसेंबरला डीसी डिझाईनचे संस्थापक, कार डिजाइनर दिलीप छाब्रियाला मुंबई पोलिसांनी अटक केली होती. छाब्रिया यांच्यावर फसवणुकीचा आरोप आहे.