मॅक्सवेलच्या पार्टीत विराट कोहलीच्या अंगात आला ‘पुष्पा’! ‘ओ अंटावा’वर थिरकला (video) | पुढारी

मॅक्सवेलच्या पार्टीत विराट कोहलीच्या अंगात आला 'पुष्पा'! 'ओ अंटावा'वर थिरकला (video)

पुढारी ऑनलाईन डेस्क

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) गेल्या महिन्यात २७ मार्च रोजी विनी रमनशी लग्नबंधनात अडकला. मॅक्सवेल आणि विनीने तमिळ पद्धतीने केलेल्या लग्नाला एक महिना पूर्ण झाल्याने एका खास रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीसह अनेक मान्यवर पोहोचले. या पार्टीचा सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीसह अनेक क्रिकेटवीरांनी रिसेप्शन पार्टीत खूपच मजामस्ती केली. यावेळी विराट दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘ओ अंटावा’ या गाण्यावर थिरकला. यावेळी विराटने ब्लॅक रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाचा पायजामा परिधान केला होता. या व्हिडिओतील खास म्हणजे, विराट पुष्पाच्या हिरोच्या स्टाईलमध्ये डान्स करताना क्यूट दिसत होता. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मादेखील रिसेप्शन पार्टीत क्यूट अंदाजात दिसली. अनुष्काने गुलाबी रंगाच्या ड्रेसमधील दोन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ‘बायो-बबलमध्ये लग्नाचा कार्यक्रम!. मला बायो-बबलमध्येच सर्व कार्यक्रम आणि सण साजरे करावे असे वाटत आहे.’ असे लिहिले आहे.

या पार्टीत विराट आणि अनुष्कासोबत रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाचा नवा कर्णधार फाफ डू प्लेसिस आपल्या कुटुंबासह पोहोचला. फाफ डूची पत्नी इमारी विसेर ही ग्रीन रंगाच्या साडीत तर तो स्वत: कुर्ता, पायजामा आणि कोल्हापूरी पायतानात दिसला. यावेळी त्याच्यासोबत दोन मुली देखील होत्या. याशिवाय शेअर केलेल्या व्हिडिओत विराटसोबत अनेकजण धुमधडाक्यात डान्स करताना दिसले.

रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) कडून आयपीएल खेळणारा मॅक्सवेल २०१७ पासून भारतीय वंशाच्या विनीला डेट करत होते. यानंतर दोघांनी गेल्या महिन्यात २७ मार्च रोजी तामिळ पद्धतीने लग्न केले. या लग्नाला काही मोजकेच नातेवाईक आणि मित्रमंडळींनी हजेरी लावली होती.

हेही वाचलंत का? 

Back to top button