सोलापूर : भाविकांच्या खासगी ट्रॅव्हल्सला अपघात; २० जण जखमी

खासगी ट्रॅव्हल्सला अपघात
खासगी ट्रॅव्हल्सला अपघात
Published on
Updated on

करमाळाण्; पुढारी वृत्‍तसेवा पुणे जिल्ह्यातील भाविकांच्या ट्रॅव्हलसला करमाळा तालुक्यातील आवटी येथील वली चांद पाशा दर्गाहच्या दर्शनासाठी जात असताना अपघात झाला. ही ट्रॅव्हल्‍स बस वीट जवळील पळसओढा भागात पलटी होऊन रस्त्यावरून खाली घसरली. या अपघातात 20 भाविक किरकोळ जखमी झाले आहेत. त्यामध्ये चार ते पाच भाविकांना मोठी दुखापत झाली असल्याचे वृत्त आहे.

आम्मार खान (वय 19) अर्शद शेख (वय 30) कुद्दुस भट्टी (वय 18) इम्तियाज भट्टी वय (40) हे गंभीर जखमी झाले आहेत. याबरोबरच नाजमीन शेख (वय 45) सलीमा शेख (वय 70) शबनम भट्टी (वय 23) गफ्फार खान (वय 48) नेहा शेख (वय 29) निलोफर भट्टी ( 35), अफरोज खान (वय 38) अमर शेख (वय 4), इनायत शेख (वय 5), खतिजा शेख (वय 23) ,अमिना शेख (वय 12) परविन शेख (वय 45), शहबाज शेख (वय 32 मिजबा खान (वय 25 ), उमामा खान (वय17) ,फरहान शेख (वय 39) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.
त्यांना करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात आज (बुधवार) रोजी पावणेसात वाजता विट जवळ घडला आहे.

उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या जखमींवर तातडीने उपचार केले असुन, सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल कोळेकर यांनी सांगितले. या 20 जखमींपैकी चौघेजण अधिक जखमी झाले आहेत.

अनेक दिवसांपासून कोर्टी ते आवटी या रस्त्याचे काम सुरू असून, वीट परिसरात रस्ता जवळपास पूर्ण झालेला आहे. या रस्त्यावरून वेगवान वाहतूक सुरू आहे. कोठेच गतिरोधक नाही. त्यामुळे पळसओढा परिसरात आज सकाळी एक खाजगी ट्रॅव्हल्स पलटी होऊन रस्त्यावरून शंभर फुटापर्यंत खाली घसरली. वीट ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे सर्व जखमींना त्यांनी स्वतः च्या वाहनाने तात्काळ  करमाळ्यातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. घटना घडली त्यावेळी तात्काळ रुग्णवाहिका आल्या होत्या. उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिका-यांचे पथकही हजर होते.

या अपघातात वेगात असलेली ट्रॅव्हलस पलटी होऊन शंभर फुट फरफटत जाऊन देखील २३ जणांचे प्राण वाचले आहेत. याबाबत माहिती अशी की, बस पुणे येथुन 23 प्रवाशी भाविकांना घेऊन आवाटी दर्गाह येथे खासगी ट्रॅव्हल निघाली होती. या अपघातात चार जणांना किरकोळ दुखापती झाल्या असून, बाकीचे सर्व व्यवस्थित आहेत. या मध्ये दहा पुरुष, आठ महिला आणि पाच लहान मुले होती.
घटनेचे गांभीर्य ओळखून वीट गावचे गणेश ढेरे हे स्वतः ची चारचाकी गाडी घेऊन जखमीना करमाळा येथे घेऊन गेले. तर दोन ॲब्‍युलन्सही तात्‍काळ दाखल झाल्‍या.

रस्ता चांगला झाल्याने वाहनं सुसाट वेगाने धावत आहेत आणि कुठं ही गतिरोधक नाही गावाजवळ शाळा जवळ ही गतिरोधक बनवला नाही. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. आज झालेल्या अपघातात ड्रायव्हरचे गाडीवरील नियंत्रण सुटल्‍याने हा अपघात झाला आहे.
…तेजस ढेरे, सामाजिक कार्यकर्ते, वीट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news