मुंबई लोकल संदर्भात विजय वडेट्टीवारांचे मोठे वक्तव्य  | पुढारी

मुंबई लोकल संदर्भात विजय वडेट्टीवारांचे मोठे वक्तव्य 

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. मुंबईतील लोकल सेवा लवकरच सुरू करण्याचा गांभीर्याने विचार करू, असे वक्तव्य राज्याचे मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.   

३१ डिसेंबरनंतर लोकल सुरू करण्याचा विचार शासनाधीन आहे. नव्या वर्षात जानेवारीपासून मुंबई लोकल सुरू करण्याचा आम्ही गांभीर्याने विचार करत आहोत. येत्या १५ दिवसांत आढावा घेतला जाईल, असेही वडेट्टीवार म्हणाले. 

लॉकडाऊनपासून मुंबईतील लोकल सेवा ठप्प होती. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत. शिवाय, नोकरदार, गृहिणी, विद्यार्थी यांना लोकलने प्रवास करणे परवडत होते. त्यामुळे मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल तत्काळ सुरू करावी, अशी मागणी होत आहे.    

 

Back to top button