Instagram Down : सोशल मीडिया पूर्ववत; फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, व्हॉट्सॲप डाऊन झाल्याने युजर्सना मोठा फटका

Instagram Down : सोशल मीडिया पूर्ववत; फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, व्हॉट्सॲप डाऊन झाल्याने युजर्सना मोठा फटका
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क :  आज (दि. ५) संध्याकाळी फेसबुक, इंस्टाग्राम (Instagram), यूट्यूब आणि व्हॉट्सॲप भारतात आणि जगातील अनेक भागांमध्ये डाउन झाल्याने युजर्समध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला. नेटिझन्सनी एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) तक्रारींसह आणि मीम्सचा पाऊस पडला. त्यापैकी अनेकांनी 'सायबर हल्ला' झाल्याने अकाऊंट्स हॅक होण्याची भीती देखील व्यक्त केली आहे. संध्याकाळी ११ वाजताच्या सुमारास या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म साइट सुरु झाल्यानंतर युजर्सच्या जीवात जीव आला. Down

भारतासह अनेक देशांमध्ये आज (दि. ५) सायंकाळी सोशल मीडिया आणि व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म वापरण्यास अडथळा निर्माण झाला. या अडथळ्यानंतर मेटा युजर्सनी एक्सवर अकाऊंटवर सर्व्हर डाउन झाल्याची तक्रार देण्यास सुरुवात केली. या तक्रारींमध्ये युजर्स म्हणतात की, मेटाच्या मालकीचे इंस्टाग्रामवरील फीड लोड होत नाही, यामध्ये काहीही करू शकत नाही. युजर्सना निर्माण झालेला अडथळा कशामुळे निर्माण झाला याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही. मात्र ११ वाजताच्या सुमारास या साइट पूर्ववत झाल्या.

Facebook Down

Facebook Down: डाउनडिटेक्टरने दिलेल्या माहितीनुसार, फेसबुक आणि इंस्टाग्रामवरील वापरकर्त्यांना भारतीय वेळेनुसार सुमारे 8.30 वाजताच्या सुमारास या समस्यांचा सामना करावा लागला. DownDetector ने अहवाल दिला की, जवळपास 77% ॲप वापरकर्त्यांना समस्यांचा सामना करावा लागला. तर 21 टक्के वेब वापरकर्त्यांनी घट नोंदवली आहे.

Instagram Down

Instagram Down : Downdetector ने Instagram बद्दल सांगितले की, ॲपच्या 72% वापरकर्त्यांना या समस्येचा सामना करावा लागला. आणि 20 टक्के वापरकर्त्यांना लॉग इन करण्यात अडचण येत होती.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news