

घोरण्याचा त्रास (Snoring problem) कमी होत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. कारण बर्याच लोकांना घोरणे हा दोष आहे असे वाटतच नाही. प्रत्यक्षात तो श्वसन यंत्रणेचा दोष आहे. त्याच्या तोंडातून, नाकातून श्वासोच्छ्वासाद्वारे घेतली जाणारी हवा नीट वाहत नसते. झोपत घोरण्याची सवय असणारे जेव्हा जोरजोराने घोरायला लागतात तेव्हा आपण घोरत आहोत, हे त्यांच्या लक्षात येत नाही. कारण त्यावेळी ते झोपेत असतात. परंतु त्यांच्या जवळपास जागे असणार्या लोकांना मात्र त्यांच्या घोरण्याचा त्रास होतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीचे घोरणे त्याच्यासाठी नव्हे तर त्याच्या शेजारी झोपणार्यासाठी त्रासदायक असते. म्हणून घोरणारी व्यक्ती (Snoring problem) आपल्या घोरण्याचा त्रास कमी कसा होईल यावर गांभीर्याने विचार करत नाहीत.
त्याला आपले घोरणे त्रासदायक वाटत नसले तरी त्याच्या प्रकृतीसाठी ते घातकच असते. काही काही वेळा तर घोरण्यास कारणीभूत ठरणारी श्वसन संस्थेतील विकृती जीवघेणीसुद्धा ठरू शकते. म्हणून घोरण्याचा त्रास कमी होत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. कारण बर्याच लोकांना घोरणे हा दोष आहे असे वाटतच नाही. प्रत्यक्षात तो श्वसन यंत्रणेचा दोष आहे. त्याच्या तोंडातून, नाकातून श्वासोच्छ्वासाद्वारे घेतली जाणारी हवा नीट वाहत नसते. डॉक्टरकडे जाण्याआधी काही साधे उपाय केले तर घोरण्यावर ते फायदेशीर ठरू शकतात. उताणे झोपण्याऐवजी एका कुशीवर झोपावे. विशेषत: डाव्या कुशीवर झोपणे हितकारक असते. त्यामुळे घशातले स्नायू एका बाजूला पडतात आणि घोरण्याची गरज पडत नाही. झोपण्यापूर्वी नाकपुडीमध्ये एक स्प्रे फवारला जातो. त्यामुळेसुद्धा तात्पुरता दिलासा मिळू शकतो.
मर्यादेपेक्षा अधिक धूम—पान करण्यानेसुद्धा घोरणे वाढते. तेव्हा सिगारेटच्या संख्येत घट करणे हा घोरण्यावरचा एक उपाय आहे. मर्यादेपेक्षा अधिक वजन असणे हेही घोरण्याच्या बाबतीत धोकादायक असते. तेव्हा वजन मर्यादित ठेवणे हा एक चांगला उपाय आहे. घोरण्यावरचा आणखी एक उपाय म्हणजे झोपताना थोड्याशा उंच उशा वापरणे.
डॉ. महेश शिंगाडे