

पुढारी ऑनलाइन डेस्क : Smriti Irani : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसला थँक यू म्हटले आहे. हे वाचून आश्चर्य करून घेऊ नका. कारण स्मृती इराणी यांनी काँग्रेसला हा उपरोधिक टोला लगावला आहे. पाटणा येथे होणाऱ्या विरोधी पक्षांच्या महाबैठकीला काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे हे उपस्थित राहणार आहेत. या महाबैठीकीवर स्मृती इराणी यांनी काँग्रेसला हा उपरोधिक टोला लगावला आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्व विरोधी पक्षांनी आपली कंबर कसली आहे. या निवडणुकीत भाजपला हरवण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकजूट करावी यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार यांनी पाटण्यात महाबैठक बोलावली आहे. या महाबैठकीला देशातील 24 पक्ष एकत्र येणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे देखील सहभागी झाले आहेत.
ही महाबैठक अनेक अंगांनी महत्वपूर्ण मानली जात आहे. कारण या बैठकीला देशातील सर्वच विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. तसेच आगामी लोकसभा निवडणूक एकत्र लढण्यासाठी भाजप विरोधी सर्वच पक्षांची संयुक्त आघाडी निर्माण व्हावी. तसेच एकजूट झाल्यास या आघाडीचे नेतृत्व कोण करणार यावरही चर्चा होणार आहे.
एकीकडे ही महाबैठक होत असताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यूएस दौऱ्यातील महत्वपूर्ण निर्णयावर भाष्य केले. त्या म्हणाल्या, पंतप्रधानांच्या युनायटेड स्टेट्स भेटीमुळे संरक्षण, अक्षय ऊर्जा आणि महत्त्वपूर्ण खनिज सहकार्य यासारख्या क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण परिणाम दिसून आले. भारत आणि अमेरिकेने अंतराळ आणि संरक्षण क्षेत्रात अनेक करार केले. सेमीकंडक्टर सप्लाय चेन आणि इनोव्हेशन पार्टनरशिपवरील सामंजस्य करार केवळ संशोधनच नव्हे तर व्यवसायाच्या संधींनाही चालना मिळेल.
पुढे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी विरोधकांच्या पाटण्यातील महाबैठकीवर काँग्रेसला टोला लगावला त्या म्हणाल्या "मी विशेषत: काँग्रेसचे आभार मानते की त्यांनी जाहीरपणे जाहीर केले की ते एकटे पंतप्रधान मोदींना पराभूत करू शकत नाहीत आणि तसे करण्यासाठी त्यांना इतरांच्या पाठिंब्याची गरज आहे."
हे ही वाचा :