Shinkun La : मोदी सरकारचे सुरक्षेच्या दृष्टीने मोठे पाऊल, शिंकून पास बोगद्याला मंजुरी, वाचा काय आहे लष्करी महत्व…

shinkun la
shinkun la
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : Shinkun La : चीन-पाकिस्तानच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी आणि सीमेची सुरक्षा मजबूत करण्याच्या दृष्टीने मोदी सरकारने आणखी एक मोठे आणि महत्वाचे पाऊल उचलले आहे. केंद्रीय कॅबीनेटने बुधवारी (दि.15) सिंकुलना बोगद्याला मंजुरी दिली आहे. हा बोगदा लडाख सीमेच्या सुरक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. जाणून घेऊ या या सिंकुन पास बोगद्याचे महत्व…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळ मीटिंगमध्ये मू-पदम-दरचा रोड सम्पर्कवर शिंकून सूरंग Shinkun La (बोगदा) निर्माण करण्याची मंजुरी दिली आहे. या बोगद्यामुळे लडाखसोबत कोणत्याही प्रकारच्या वातावरणात कनेक्टिव्हिटी मिळेल. ही सुरंग 4.8 किलोमीटर इतकी लांब असणार आहे. 'शिंकुन ला' ही सुरंग सैन्य दलाला त्यांच्या सामानासहित येण्याजाण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. सूचना आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी याविषयी माहिती दिली. ते म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळात याच्या प्रस्तावावर मंजुरी देण्यात आली आहे. त्यांनी म्हटले की डिसेंबर 2025 पर्यंत सुरंग बनवून पूर्ण होईल. यासाठी 1681 कोटी रुपयांचा खर्च लागणार आहे.

काय आहे शिंकुन ला Shinkun La चे महत्व

शिंकुन ला बोगदा लष्करासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे बोलले जात आहे. हा बोगदा सुरू झाल्यानंतर, लष्कराचे जवान आणि उपकरणे कोणत्याही हंगामात येऊ शकतील. यापूर्वी सीमेवर पोहोचण्यासाठी दारचा-पदम-निमो हे बीआरओने 2019 मध्ये तयार केले होते, मात्र, या रस्त्यावरील थंडी आणि 16 हजार 703 फूट उंचीवर असलेल्या शिंकुन ला येथे बर्फवृष्टीमुळे लष्कराला यामध्ये मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नवीन तयार होणारा शिंकुन ला हा बोगदा सैन्याला द्रूतगतीने कोणत्याही वातावरणात त्यांच्या साहित्या सह ये-जा करण्यासाठी मोठा सहाय्यक ठरणार आहे.

Shinkun La चीन आणि पाकिस्तानचा धोका लक्षात घेता 'शिंकुन ला' बोगदा लष्करासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण एलओसीजवळील श्रीनगर-द्रास-काकसर-कारगिल महामार्ग आणि एलएसीजवळील मनाली उपशी-लेह महामार्गापेक्षा हा बोगदा अधिक सुरक्षित आहे. 2020 मध्ये चिनी लष्कराशी झालेल्या चकमकीनंतर भारतीय लष्कराने दारचा-पदम-निमो रस्त्याचा वापर शस्त्रास्त्रे आणि इतर वस्तूंसाठी केला. केंद्रीय मंत्रिमंडळाने सात नवीन बटालियन आणि भारत-चीन सीमेचे रक्षण करणार्‍या इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (ITBP) चे प्रादेशिक मुख्यालय स्थापन करण्यासही मंजुरी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news