

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : अवकाशात ऑगस्ट महिन्याच्या शेवटी दोन महत्वाच्या सुंदर घडामोडी घडणार आहेत. २७ व २८ ऑगस्ट ला अवकाशात सुंदर दिसणारा शनी ग्रह पृथ्वीच्या जवळ येवून तेजस्वी दिसेल. तर ३१ ऑगस्ट रोजी रात्रीची पौर्णिमा ही सुपरमुंन आणि ब्लू मून पोर्णिमा असेल. ह्या रात्री चंद्र मोठा आणि जास्त प्रकाशमान दिसेल अशी माहिती खगोल अभ्यासक आणि स्काय वाँच ग्रुप चे अध्यक्ष प्रा सुरेश चोपणे ह्यांनी पुढारीशी बोलताना दिली.
दरवर्षी ३७८ दिवसा नंतर शनी ग्रह पृथ्वीच्या कमी-अधिक जवळ येत असतो ह्याला अप्पोझीशन (Apposition) असे म्हणतात. म्हणजे पृथ्वीच्या एका बाजूला सूर्य तर विरोधी बाजूला शनी असतो. शनी दर २९.५ वर्षाने सूर्याची एक प्रदक्षिणा करीतो. ह्या दरम्यान शनी आणि पृथ्वीच्या अंतरात बदल होत असतो. मागील वर्षी १४ ऑगस्ट, ह्या वर्षी २७ ऑगस्ट तर पुढील वर्षी शनी ८ सप्टेंबरला जवळ असेल. येत्या २७ ऑगस्ट रोजी शनी ग्रह कुंभ(Aquarius) राशीत दिसणार असून तो आकाराने मोठा आणि ०.४ प्रतीच्या (Magnitude) तेजस्वीतेचा दिसेल. शनीचे त्यावेळेसचे अंतर ८.७६ अँष्ट्रोनोमिकॅल युनिट (AU) किंवा १.२ बिल्लीयन कि.मी असेल. शनीला पाहण्यासाठी दुर्बिणीची गरज भासत नाही, तो साध्या डोळ्याने देखील तेजस्वी दिसतो. परंतु शनीची कडी पहायची असेल तर मोठी द्विनेत्री किंवा ३/४ इंचाची दुर्बिणीची गरज भासते .ह्या वेळेस शनीची कडा ८.१ डिग्रीने झुकलेली दिसेल आणि सिलीगर इफेक्ट पहावयास मिळेल. शनी सुर्यास्तानंतर पूर्वेला उगविताना दिसेल. त्याची तेजस्विता क्षितिजावर आल्यानंतर वाढत जाईल. जरी तो एक आठवडा प्रखर तेजस्वी दिसणार असला तरी शनि ग्रहाला ऑक्टोबर महिन्या पर्यंत पूर्वेला पाहता येईल. सिलीगर एफ्फेक्ट ( Seelinger effect) म्हणजे काय ? शनी पुथ्वीवरून अगदी सरळ रेषेत दिसत असल्याने आणि सूर्य अगदी मागे असल्याने शानिवरील वायूचे वातावरण आणि शनीच्या कडीवर असलेले हिमकण अगदी चकाकतात ह्यालाच सिलीगर एफ्फेक्ट असे म्हणतात. हा इफेक्ट फक्त शनीच्या अपोझीशण वेळेसच दिसतो. सर्व खगोल प्रेमींनी साध्या डोळ्याने,द्विनेत्री किंवा दुर्बिणीने शनीला जरूर पहावे असे आवाहन स्काय वाच ग्रुप तर्फे करण्यात येत आहे.
दर महिन्याला पोर्णिमा असते. तेव्हा देखील चंद्र बिंब मोठे आणि तेजस्वी दिसतेच, परंतु अश्या पौर्णिमेच्या दिवशी जेव्हा चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो तेव्हा मात्र चंद्रबिंब आणि प्रकाश सर्वसाधारण पौर्णिमेपेक्षा ७% तर मायक्रोमून (Micromoon) पेक्षा १४ % जास्त मोठा दिसतो. चंद्र अंडाकार मार्गाने पृथ्वी प्रदक्षिणा करताना वर्षातून दोन वेळा जवळ येतो परंतु दरवर्षी ३ सुपरमून होतात .नियमाप्रमाणे चंद्र-पृथ्वीचे अंतर जेव्हा ३६०,००० किमी पेक्षा कमी असले पाहिजे. ह्या पौर्णिमेला चंद्र-पृथ्वी अंतर ३५७,००० किमी असेल. ( चंद्र जेव्हा दूर असतो तेव्हा चंद्र-पृथ्वीचे अंतर ४०५,००० किमी असते तेव्हा चंद्र आकाराने लहान दिसतो त्याला मायक्रो मून म्हणतात.) जेव्हा चंद्र पृथ्वीच्या जवळ असताना पौणिमा होते तिला सुपरमून असे म्हणतात. परंतु ह्या ऑगस्ट महिन्या प्रमाणे दर दोन वर्षातून एकदा एकाच महिन्यात दोन पोर्णिमा येतात ( १ आणि ३१ ऑगस्ट) तेव्हा त्या दुसऱ्या पौनिमेला ब्लू मून असे संबोधतात. ह्यातील ब्लू शब्दाचा आणि चंद्राचा काहीहीसबंध नाही. चंद्र निळा दिसणार नाही. पुढील सुपरमून हा १८ सप्टेंबर, १७ ऑक्टोबर २०२४ रोजी होईल.
३१ ऑगस्ट रोजी होणारी पौर्णिमा पावसाच्या किंवा ढगाळ हवामानामुळे काही ठिकाणी दिसण्याची शक्यता नसली तरी अनेक ठिकानी ती अल्प किंवा पूर्ण दिसण्याची शक्यता आहे. पौर्णिमेचा चंद्र दुर्बिणीने चांगला दिसत नाही, त्याला साध्या डोळ्याने पाहणे योग्य असते. ह्या आठवड्यात २७ रोजीचे शनी आणि ३१ रोजीचे चंद्र निरीक्षण अवश्य करावे असे आवाहन स्काय वाँच ग्रुप च्या वतीने प्रा. सुरेश चोपणे यांनी केले आहे.
हेही वाचा