सातारा : पाटण तालुक्यातील पर्यटन स्थळे; दमदार पाऊस, कोयना धरणासह धबधबे | Satara Tourist Places

सातारा : पाटण तालुक्यातील पर्यटन स्थळे; दमदार पाऊस, कोयना धरणासह धबधबे | Satara Tourist Places
Published on
Updated on

Satara Tourist Places : पाटण तालुका म्हटलं की निसर्गाची अद्भुत व अद्वितीय अशी साधनसंपत्ती. पावसाळ्यात हिरव्यागार निसर्गात शेकडो धबधब्यांचं माहेरघर असणार्‍या या तालुक्यात आता पावसाळी पर्यटनाला अच्छे दिन आल्याचे पहायला मिळत आहे. दमदार पाऊस, कोयना धरण, ओसंडून वाहणार्‍या धबधब्यांसह हिरव्यागार निसर्गात चिंब भिजायला आणि मनमुराद आनंद घ्यायला दैनंदिन हजारो पर्यटकांची पावले आपोआपच कोयनेकडे वळायला लागली आहेत.

पाटण तालुक्यातील ओझर्डे (नवजा), सडा सडावाघापूरचा (Reverse water fall) उलटा धबधबा, बोपोली, कोंडावळे, ढाणकल, घाटमाथा, शिरळ, गाढवराई, कामरगाव, हुंबरळी आधी कोयनेसह मोरणा, तारळे विभागातील स्थानिक अत्यंत आकर्षक असे नयनरम्य धबधबे सध्या ओसंडून वाहत आहेत. त्याचवेळी कोयना धरण जलाशय असो किंवा काठी आयलँड पवनचक्क्यांचा हिरवागार प्रदेश तसेच कोयनानगर येथील नेहरू उद्यानातील सध्याची सौंदर्य हे पर्यटकांना आकर्षित करत आहेत. तालुक्यातील मोरणा गुरेघर, तारळी आदी छोट्या-मोठ्या धरणांचे परिसरही सध्या पर्यटकांनी फुलल्याचे पहायला मिळत आहेत . प्रामुख्याने कोयना विभागात पर्यटन सध्या फार मोठ्या प्रमाणात दोर बहरले असून त्यामुळे स्थानिक रिसॉर्टस्, हॉटेल्स ते अगदी छोट्या-मोठ्या चहा, वडापाव, भजीच्या टपर्‍या, स्थानिक वाहतूक व्यवस्था यामुळे पर्यटनासोबतच स्थानिक रोजगार, व्यवसायालाही चांगलीच चालना मिळाल्याचे अनुभवायला येत आहे. पावसाळ्यातील या निसर्गाने नटलेल्या स्थानिक सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, कोयना अभयारण्य, पश्चिम घाट प्रकल्प, इको सेन्सिटिव्ह झोन यामधला जंगलाचा परिसरही सध्या हिरवाईने नटला आहे. निश्चितच पर्यटकांच्यासाठी येथेही दरवर्षी चांगली संधी उपलब्ध होत असल्याने केवळ तालुका, जिल्हा व राज्यातीलच नव्हे तर गेल्या काही वर्षांपासून परराज्यातीलही बहुसंख्य पर्यटक (Satara Tourist Places)  कोयनेला भेट देत असतात.

निश्चितच गेल्या काही वर्षांत पर्यटकांची ही लाखोंची संख्या येणार्‍या काळात त्याचपटीत वाढण्यासाठी पर्यटन विकासाच्या द़ृष्टीने प्रामुख्याने नवीन महाबळेश्वर प्रकल्प , कोयना जलाशयातील बंद पडलेले बोटिंग आणि पर्यटन विकासासाठी आवश्यक त्या उपाययोजना होणेही पर्यटन व स्थानिकांच्या द़ृष्टीने तितकेच महत्त्वाचे बनले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news