सना खान यांच्या हत्येनंतर संशयित आरोपी सना यांचा पती पप्पू उर्फ अमित साहू, कुणाच्या संपर्कात होते, त्यांना कोणी आश्रय दिला यादृष्टीने पोलीस पथके तपास करीत आहेत. अजूनही नागपूरच्या मानकापूर पोलिसांची पथके जबलपूर आणि परिसरात तळ ठोकून आहेत. आमदार संजय शर्मा यांच्याशी देखील अमित यांचे निकटचे संबंध असल्याने या चौकशीतून नवी माहिती पुढे येऊ शकते. सना खान यांचा स्वतःच्या राजकीय व आर्थिक लाभासाठी हवा तसा वापर संशयित आरोपी अमित साहू यांनी केला. सनाच्या बेपत्ता मोबाईलमध्ये अनेकांचे आक्षेपार्ह फोटो, क्लिप असल्याचे बोलले जात असल्याने अनेकांची झोपमोड झाली आहे.