औषधामुळे खोकला!

औषधामुळे खोकला!
औषधामुळे खोकला!
Published on
Updated on

आज ऑफिसला दांडी का चिरंजीव?
नाही अण्णा. तब्येत बरी नाही.
का रे? काय होतंय? दवापाणी सगळं बघितलंयस ना ?
तेच तर खटकतंय. ताप, अपचन असं वाटत होतं चार दिवस. सरळ ऑनलाईन औषधं घेतली मागवून; पण म्हणण्यासारखा आराम पडत नाहीये.
पोट दुखतंय?
हो. थोडंसं.
मित्राला प्रमोशन मिळालं तुला नाही, असं झालंय का?
अण्णा, मी असा 'जळाऊ लाकडाची वखार' कधीच नव्हतो. उलट कंपनीने मला मोठ्या प्रोजेक्टचं हेड केलंय, त्या प्रेशरमध्ये आजारपणात वेळ जायला नको मला.
कबूल.
म्हणून म्हटलं, बाहेर गेलात तर माझ्यासाठी दोन-तीन औषधं आणा जरा.
तू ऑनलाईन मागवलीये म्हणालास ना?
हो. ती अ‍ॅलोपॅथीची, तुम्हाला आयुर्वेदाची आणायला सांगेन.
आणायला काही नाही मला; पण एवढा सगळा मारा करायला हवाच का?
वेळ अण्णा वेळ. औषधांवर पैसे जाऊ देत एकवेळ पण आजारात वेळ जायला नकोय मला. काल माझा कलीग फोनवर म्हणत होता, त्याची एक मावशी होमियोपॅथीची छान औषधं देते अशा आजारावर!
आणखी कोणी युनानी, पुष्पौषधी, रेकी वगैरेतले तज्ज्ञ नाहीत का ओळखीत?
माझं डोकं आधीच उठलंय, आणखी उठवू नका अण्णा. वेळेवर बरं होणं हा मुद्दा असतो आमच्यात.
म्हणजे तुझ्या मते, आम्हाला काय अंथरुणात खितपत पडायला आवडत होतं का रे?
माहीत नाही; पण समजा, तुमच्यापेक्षा आमच्या खिशात पैसे आहेत थोडे जास्त, आम्ही केले औषधावर जरा जास्तच खर्च, तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे?
मला प्रॉब्लेम असो, नसो! तुझ्या शरीराला या उलटसुलट गोळीबाराचा त्रास होतोय का ते बघ सोन्या!
तो कसा काय?
अरे, वेगवेगळ्या पॅथी म्हणजे औषधप्रणाल्या वेगवेगळ्या विचारातून, अभ्यासातून आलेल्या असतात. त्यांची अशी भेळमिसळ कशी परिणामकारक होईल?
मी सगळी जेनेरिक औषधं ऑनलाईनच मागवतो!
कशावरून ती अचूक असतात? वापरायची मुदत संपल्यानंतरची नसतात? कशावरून त्यात भेसळ नसते? ती आल्यावर डॉक्टरला दाखवून तरी घेतोस की नाही?
एवढा रिकामा वेळ असता तर काय आणखी काय पाहिजे असणार बाबा?
वेळ, वेळ करत आरोग्याशी खेळ करू नका रे! मनानं औषधं तर अजिबात घेऊ नका.
उगाच चूक काढायची म्हणून काढताय वाटतं?
नाही रे. बनावट औषधं, अनावश्यक औषधं, परस्पर मारक औषधं घेण्यापायी आज अनेक तरुणांचं आरोग्य धोक्यात येतंय. जागतिक आरोग्य संघटना म्हणजे थकज ने याबाबत इशारा दिलाय.
बरं. आता औषधाविना खोकला जाईल ह्याची वाट बघत बसतो हं!
तेवढं नको करायला एकदम. पण चुकीच्या औषधामुळे, स्वयमोपचार म्हणजे सेल्फ मेडिकेशनने खोकला बळावायची वाट बघू नकोस. तब्येत ठणठणीत राहिली तर खूप कामं उरकतील. वेळ वाचेल एवढं ध्यानात धरलंस तरी खूप!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news