Ustad Zakir Hussain | अलविदा उस्ताद !

Ustad Zakir Hussain| झाकीर यांनी असंख्य शिष्य घडवले आणि अनेक सामाजिक कामांसाठी मदतही केली.
Ustad Zakir Hussain
Ustad Zakir HussainPudhari News network
Published on
Updated on

जागतिकीकरण, माहिती-तंत्रज्ञान आणि क कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वा वेगवान भारतीय शास्त्रीय संगीताची मी महती आणि महत्त्व अद्याप टिकून आहे. पंडित रविशंकर, विलायतखाँ, अल्लारखॉ, शिवकुमार शर्मा, हरिप्रसाद चौरसिया, भीमसेन जोशी, पंडित जसराज अशा अनेक गायक-वादकांनी भारतीय संगीताचे सूर देश विदेशांत पोहोचवले.

शास्त्रीय संगीतात सूर आणि ताल या दोन्हींना महत्त्व असते. हे दोन्ही जुळले नाहीत, तर वातावरण बेसुरे होते. सुरांना तालाची साथ नसेल, तर मनाव येत नाही. मात्र, केवळ तालालाही एक स्वतंत्र महत्त्व आणि लय असते. जगप्रसिद्ध तचलावादक झाकीर हुसैन यांच्या निधनामुळे सूर पोरके झाले आहेत आणि असंख्य रसिकांच्या दृष्टीने जीवनातील तालब स्तब्ध झाला आहे.

भारतातील महान तबलावादकांचा विचार केला, तर पंडित अनोखेलाल मिश्रा, अमीर हुसेन खाँ, अहमदजान थिरकया, इनाम अली खाँ, पॉडित किशन गहतराज, खाप्रगामा पर्वतकर, ज्ञानप्रकाश घोष, नत्थूखाँ, निखिल घोष, निझामुद्दीन खॉ, मेहबूजखाँ मिरजकर, कोल्हापूरचे बाळूभाई रुकडीकर, र, सामता प्रसाद अशा अनेकांचा उल्लेख आवर्जुन करावा लागेल. यात आणखी एक नाव आहे, ते अर्थातच झाकीर हुसैन यांचे अच्चाजान उस्ताद अल्लारखों पांचे. आपल्या अब्बाजानच्या तालमीतच झाकीर तयार इशलले, उस्ताद अपनारखी हे आंतरराष्ट्रीय कीतीचे भारतीय तबलावादक आणि श्रेष्ठ कलावंत. झाकीर हे नेहमी आपल्या अब्बाजानच्या आठवणी जाहीर कार्यक्रमांतूनही सांगत असत.

अल्लारख़ाँ वयाच्या बाराव्या वर्षीच घर सोडून लाहोरला गेले होते. तेथे पंजाब घराण्याचे उस्ताद मियों कादीरबक्ष यांच्याकडून त्यांनी तबलावादनाचे धडे घेतले. त्यानंतर पतियाळा घराण्याचे उस्ताद आशिक अली राँ यांच्याकडून त्यांनी रागदारी संगीताचे शिक्षण घेतले. १९४० साली अल्लारखॉनी मुंबईत नभोवाणी केंद्रावर तबलावादकाची नोकरी पत्करली आणि त्याचवेळी ठिकठिकाणी तबलावादनाचे कार्यक्रम करण्यास सुरुवात कागी.

१९४३ से ४८ दम्यान ए. आर. कौशी या नावाने अल्लारखॉनी चित्रपटांना संगीत दिले. आपल्या अय्याजानच्या या संपूर्ण जीवनापासून झाकीर यांनी प्रेरणा घेतली होती. अल्लारखाँ हे बनायक बजायक बतायक अशा दुर्मीळ गुणांनी सिद्ध होते. ताल व लयकारीची सूक्ष्म जाणीव व चौकस बुद्धिमत्ता जशी अल्लारखांकडे होती, तशीच ती झाकीर यांच्याकडेही होती. अल्लारखॉ यांनी जग‌विख्यात सतारवादक पंडित रविशंकर पांच्याबरोबर जपानमध्ये एक कार्यक्रम केला. तो चांगलाच रंगला आणि पुढे या जोडीने जगभर अनेक कार्यक्रम केले, पाश्चात्य संगीत रसिकांत भारतीय संगीत लोकप्रिय करण्यात या दोन दिग्गजांची कामगिरी मोलाची आहे, याचा झाकीर यांना अभिमान होता. त्यांनी स्वतः ही हीच परंपरा पुढे नेली.

अल्लारखों व झाकीर या पिता-पुत्रांची तबलावादनाची जुगलबंदी पादगार ठरली. तबलावादनात हजरजबाबी साधसंगत है इराकीर यांचे वैशिष्ट्य होते. शिवाय, ते मूळ वादकाच्या स्वनेला अनुसरून संगत करत. अल्लारखीसाहेबांनी कायदे, तिपल्ली, गत चकदार, तुकडे, चलने, विविध विरामांच्या तिहाया यांची निर्मिती केली.

पाऊण मात्रेच्या विरामाच्या तिहाईच्या निर्मितीचे श्रेय अल्लारखॉ यांच्याकडे जाते आणि हेच तंत्र इराकीर यांनीही अवगत करून न घेतले होते. पंधरा मार्शधी सवारी, अवता मात्रांची चाजालाची सवारी, नऊ मात्रांबा मत्रताल, तेरा मात्रांचा जयताल अशा अनेक तालोत अल्लारखॉ यांच्याप्रमाणेच झाकीरही स्वतंत्ररीत्या बादन करत आणि साथसंगतही करत. अगदी शिशुक्यापासून झाकीर यांचे सूर-तालाशी अनोखे बंध निर्माण झाले होते. बालवयात दुधाच्या बाटलीचर बोटे फिरवत ताल धरणारे झाकीर, वयाच्या तिसऱ्या वर्षीच पारखवाज शिकू लागले. अल्लारखौ रात्री मैफलीनंतर उशिरा परतल्यावर झाकीर त्यांच्या हाताखाली तबलावादनाचे धडे घेऊ लागले.

वयाच्या सातव्या वर्षी झाकीर यांनी आपली पहिली मैफल केली, तेव्हा त्यांना चक्क पाच रुपयांचे मानधन मिळाले होते। परंतु त्या पाच रुपयांची किंमत त्यांच्या दृष्टीने आयुष्यभर खूप मोठी राहिली, यधावकाश भीमसेन जोशी, जसराज, शिवकुमार शर्मा यांच्याबरोबर त्यांची साथसंगत गाजू लागली. सोलोवादन, फ्युजन आणि साथसंगत या तिन्ही प्रकारांवर झाकीर यांची पकड होती. गिरिजादेवींचा टप्पा, ठुमरी वा झुला असो की भीमसेन यांचा अभंग किंवा जसराजजींचे भजन, या साऱ्या प्रकारांत झाकीर यांची साथ वैशिष्ट्यपूर्ण सिद्ध झाली.

झाकीर हे वीस वर्षांचे असताना, पंडित रविशंकर यांच्या आग्रहावरून अमेरिकेत गेले आणि तेथे त्यांच्या मैफली झाल्या. केवळ भारतीय संगीतच श्रेष्ठ, असा अहंगंड न मानता, जगातील विविध संगीत प्रवाहांशी त्यांनी आपले नाते जोडले. जॉन मॅक्लॉलीन, मिकी हर्ट, हाथी हंकॉक एरिक हलीड अश्या दिग्गज कलावंतांबरोबर झाकीर यांनी सहवादन केले. झाकीर यांनी वसंतराव देशपांडे यांना पुण्यात तबल्याची साथ केली, त्याचप्रमाणे त्यांचा नातू राहुल देशपांडे यांनाही. तसेब राहुल शर्मा, राकेश चौरसिया या नव्या पिट्टीवरीवरही झाकीर यांचे सूर जुळले. झाकीर यांची बोटे तबल्यावर अक्षरशः एखाद्या जादूगाराप्रमाणे चालत. जेव्हा मैफलीची रंगत वाडे व हुतलय सुरू होई, तेव्हा आपल्या केसांची झुलपे उडवत कमालीच्या प्रसन्न मूडमध्ये झाकीर तबला वाजवत, तेव्हा शेकडो रसिक अक्षरशः मंत्रमुग्ध होत असत.

झाकीर यांनी तीन रॉमी पुरस्कार पटकावले होते आणि दिसायला देखणे असल्यामुळे त्यांनी डझनभर चित्रपटांमध्ये भूमिकाही केल्या होत्या. मर्चट आयव्हरी यांच्या गाजलेल्या 'हिंट अॅड जस्ट मध्ये त्यांची भूमिका होती. त्याचप्रमाणे सई परांजपेंच्या 'साज' चित्रपटातही ते होते, प्रयोगशीलता, अंगभूत प्रतिभा आणि जोमदार वादनशैली यामुळे एकल तबलावादनाला स्वतःची एक ओळख मिळवून देण्यात झाकीर यांचा सिंहाचा वाटा होता.

झाकीर यांनी असंख्य शिष्य घडवले आणि अनेक सामाजिक कामांसाठी मदतही केली. कमालीचा सहृदय आणि माणुसकी असलेला हा कलाकार एकप्रकारे हिंदू-मुस्लिम सांस्कृतिक एकतेचे प्रतीक बनला होता. सध्याच्या प्रदूषित वातावरणात झाकीर हुसैन यांच्यासारख्या कलावंतांचे निघून जाणे, हे काळजाला जखम करून जाणणारे आहे. अलविदा उस्ताद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news