Womens Day | कुकूचकू ऽऽ..!

Womens Day
Womens Day | कुकूचकू ऽऽ..!
Published on
Updated on

निर्मला : (दार उघडत.) आश्चर्य आहे. आज कामातून सुटका झाली म्हणायची.

कमला : महिला दिनाच्या खूप शुभेच्छा! हे घे माझ्या बागेतील गुलाबाचे फूल! मुद्दाम आले शुभेच्छा द्यायला. रंगपंचमीपण आहे. एरवी तू येतेस एप्रिल फूल करायला.

निर्मला : म्हणून होय? खरं फूल असताना झाडाचं कशाला तोडलीस. ही ही हीऽऽ!

कमला : म्हणजे मी तशी फूल आहे का? एप्रिलवाली?

निर्मला : रागावू नको. बरं, चहा घेणार की कॉफी?

कमला : नको. आत्ताच उरकलं सगळं. अजून सोसायटीमध्ये मधू आणि रागिणीकडेही जायचंय. त्याही चिडवतात मला घरकोंबडी म्हणून. त्या दोघींना त्यांच्या खुराड्यात जाऊन शुभेच्छा देते.

निर्मला : किती घाई? नको जाऊ त्यांच्याकडे. त्या सकाळीच बाहेर पडल्या खुराड्यातून.

कमला : म्हणजे त्या दोघी घरकोंबड्या नाहीत माझ्यासारख्या. जाऊदे. आपण दोघी सेलिब—ेट करू महिला दिन. संध्याकाळी तू आमच्याकडे ये जेवायला. बिर्याणी करू. मुलं आणि आमचे हे घरी नाहीत. रंगपंचमी साजरी करत आहेत.

निर्मला : अगं पण त्या दोघी असतात ना नेहमी आपल्या सेलिब—ेशनमध्ये. त्यांना येऊदे. मग ठरवू.

कमला : नको. त्या न सांगता गेल्या त्याअर्थी त्यांचा बेत वेगळा असेल.

निर्मला : तसं नसेल. आपण फोन करू त्यांना.

कमला : असं करू. आपण त्यांच्यासाठी पण बेत करू. कितीसं लागेल त्यांना जेवण. बनवून ठेवू.

निर्मला : म्हणजे सरप्राईज?

कमला : हो! खुराड्यात राहणारी जास्त सुगरण असते हे दिसेल त्यांना.

निर्मला : आम्ही नोकर्‍या करतो म्हणजे सुगरण नाही? मग नेहमीच तुझ्याकडे येतो जेवायला?

कमला : तुला नाही म्हणत. त्या चिडवतात ना...

निर्मला : चहा पी. डोकं शांत होईल तुझं.

कमला : नको खरंच. निघते मी तयारीला लागते.

निर्मला : बस गं! तुझ्यासाठी सरप्राईज आहे. रागिणी, मधू बाहेर या अशा.

रागिणी आणि मधू : महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा कमला. रंगपंचमीच्या पण. (एकमेकांना रंग लावतात) निर्मला थँक्यू अरेंज केल्याबद्दल.

कमला : या दोन कोंबड्या कशा इथे? थांबा बघते तुमच्याकडे. मला येताना पाहिला ना तुम्ही?

रागिणी, मधू : कुकुचकू...! (जोरात ओरडतात)

कमला : हे काय?

मधू : अगं कोंबड्या आहोत ना. म्हणून हाहाहा...

कमला : बस झालं. रंगपंचमी आणि महिला दिनाच्या एकत्रित शुभेच्छा. चला. रंग बदलू. म्हणजे खेळूया. आनंद द्विगुणित करूया. हा हा हा...!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news