पहिला चहा | मुकद्दर का सिकंदर...

पहिला चहा | मुकद्दर का सिकंदर...
Published on
Updated on

पस्तीस पुरणपोळ्यांचं पुराण नेटकर्‍यांनी सगळीकडे वाटलं आणि देवाभाऊंचा जुन्या पेपरातला बचपन का फोटू चर्चेत आला. काय चालू आहे देशात आणि आपण दुसर्‍याने खाल्लेल्या पुरणपोळ्या मोजत फोटू शेअर करतोय. आणि मोटारसायकलीची चर्चा काय कशासाठी? आपणच सल्ले देता नेत्यांनी दुचाकीवरून फिरावे. ताफा रद्द करावा. पेट्रोलची बचत नेत्यांनी पण करावी. काय हे नेटकर्‍यानू! भाऊ जनमताला प्राधान्य देत आहेत याची तमा बाळगावी. त्यांचे झाले की वहिनीच्या सायकलवरून चर्चा!

एकूण काय आपण चर्चेचे क्षेत्रफळ राखून ठेवलेले आहे तिथे तुम्हाला जे मनात येईल ते ट्वीटता येते, झुक्यागिरी करता येते आणि व्हॉट्सअ‍ॅप तर भटाला दिली ओसरी, भट हात पाय पसरी; आता या ओसरीवर (पर्सनल चॅट) झुक्या साहेबांना काही कळत नाही म्हणून फेसबुकला कनेक्ट होतात आणि मामला सार्वजनिक करून टाकतात. झुक्याभाऊंनी कोणत्याही कोपर्‍यातून चहाडी सार्वजनिक करण्यासाठी हा एफबीचा प्लॅटफॉर्म दिला आहे. त्यात बिचारे नेते टार्गेट होतात. असो! देवाभाऊ मात्र मोटारसायकलीचा स्टंट करत नेटकर्‍यासाठी खास गाणं गुणगुणतात. ‘रोते हुवे आते है सब, हसता हुवा जो जायेगा, वो मुकद्दर का सिकंदर जानेमन कहलायेगा’... तमाम नेटकरी चाट. (चॅटिंगवर). आता काय करावे?

दुसरी बातमी. एकाने एआयच्या मदतीने जुना फोटू शोधून आणि दिला चिकटवून बातमीला. बातमी खरी की खोटी माहीत नाही. पण पोळीप्रमाणे चविष्ट असावी यासाठी खास शेफ निवडतात नेटकरी (रिलधारी). त्यात साऊंड, गाणी काय काय मिक्स करून छानशी गंमत आणणारी हास्यजत्रा पण टाकतात. उगाच नाना पाटेकर चहा पित हसतात, एक किडमिडं पोरगं कागदी कपात चहा पित उपहासात्मक हसत प्रतिक्रिया व्यक्त करतं. काय हे नेटकर्‍यांनो. रिल बनवण्यासाठी काहीही? देवा भाऊ ताफा सोडून दुचाकीवरून फिरत आहेत. लाईट, पाणी, गॅस या समस्या या मीम बनवताना जातात कुठे? इतर वेळी तर या समस्यांवर जागरूक होऊन टोले देता. होर्मुझात काय चाललंय याचे फक्त नेत्यांच्याच कृतीवर पडसाद उमटू लागलेत. आपल्यातले काही मात्र रिकामे उद्योग म्हणून नेत्यांच्या कृतीला साथ न देता त्यांचे वाभाडे काढण्यात व्यस्त! त्यामुळे जे सुधारित समाजाची पायाभरणी करत आहेत, त्यांना हातभार लावावा.

- आपल्यातलाच एक नेटकरी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news