

ट्रम्पू तात्या : (कॉल वर) या हूss! हाय नेतान्याहू आर यू ओके देअर?
नेतान्याहू : येस फाईन! आपण कसे आहात?
ट्रम्पू तात्या : (रोषात) रास्कल? ब्लडी फूल. हाऊ डेअर यू टू आस्क धिस सिली क्वेश्चन? कोणी सांगितले हल्ले करायला बेरूतवर?
नेतान्याहू : कोणी सांगितले नाही म्हणून केले. मी कशाला वाट पाहू आपल्या आदेशाची. आपण आमचे हितचिंतक.
ट्रम्पू तात्या : हितचिंतक नंतर. चिंता करत राहा तू बेटा. डोन्ट आस्क मी व्हाय?
नेतान्याहू : व्हाय?
ट्रम्पू तात्या : शटअप! इराण आता काय करेल ते तू वाट बघत राहा. असे मूर्ख हल्ले का करता तुम्ही लोक?
नेतान्याहू : व्हॉटस् राँग इन इट?
ट्रम्पू तात्या : यू आर राँग्ग्ग गाय... हू इज लीडिंग द कंट्री लाईक इस्रायल.
नेतान्याहू : आय एम जिनियस. आय नो!
ट्रम्पू तात्या : ऐक बाळ, उगीच हट्टाला नको पेटू. ते इस्रायलविरोधात युद्ध पुकारतील. इराणशी शांतता करार हलक्यात घेतोस का तू? आमची मतं आम्ही ठामपणे बजावतो. त्यात विघ्न नको आणू इस्रायली कार्टून. जरा शांत राहा!
नेतान्याहू : तुम्ही इस्राएलचा अपमान करत आहात. लोक आपल्याला जे समजतात ते आमच्यावर नका लादू डोनाल्डजी.
ट्रम्पू तात्या : लोकांना समजू दे; पण तुला समज आली तर ठीक नाही, तर समजवावं लागेल.
नेतान्याहू : इथे निवडणूक लढताना माझीच लोकं माझा पराभव पाहण्यासाठी उतावीळ झालेत. तिकडून आपण आमची खिल्ली उडवत आहात. नॉट फाईन!
ट्रम्पू तात्या : यू आर आऊट ऑफ
युवर माईंड. हा इस्रायलसाठी खूप मोठा धोका आहे.
नेतान्याहू : शांतता करारात हा मुद्दा मांडता येईल की, इस्रायलचे हल्ले थांबवायचे असतील, तर इराणने अटी मान्य कराव्यात.
ट्रम्पू तात्या : ओ माय गुडनेस. असा खेळ आहे तर? मला समजलेच नाही. सो चाइल्डिश! त्यासाठीच हल्ले करतात ना? ते ऑलरेडी इराणला माहिती आहे. यावेळी इराण कोणती चाल खेळेल हे त्यांनाच माहिती. त्यामुळे सावध बेटा. तुझी खैर नाही. क्रेझी गाय! नॉट बॅड. खेलो जी भर के. जियो मार खा खा के! तोपर्यंत बाय बाय... टेक केअर!