पहिला चहा | ‘चीप’ प्रेम कहाणी!

Huang Trump Meeting
पहिला चहा | ‘चीप’ प्रेम कहाणी!
Published on: 
Updated on: 

(हुआंग यांचा घनिष्ठ मित्र ट्रम्प यांच्याशी झालेला संवाद)

हुआंग : हॅलो, मिस्टर प्रेसिडेंट. राजीनामा दिलाय. प्रेमाचा आरोप आणि आता हेरगिरीचा संशय! आयुष्यात चिपपेक्षा जास्त सर्किट झालेत.

ट्रम्प : आय नो एव्हरीथिंग, जेनसन! मला सगळं आधीपासून माहीत होतं. ॲलिस कोण आहे, कुठून आली, काय करते... बट डोन्ट वरी मी तुमच्या मागे उभा आहे.

हुआंग : सर, तुम्ही मागे उभे आहात की माझ्यावर नजर ठेवत आहात?

ट्रम्प : दोन्ही! मी अध्यक्ष आहे. माझी नजर प्रेमावरही असते आणि प्रोसेसरवरही. चीनवर तर विशेष असते.

हुआंग : अमेरिकी यंत्रणा ॲलिस यांना चिनी हेर समजते...

ट्रम्प : फू... चीनने आरोप फेटाळलेत ना! नाहीतरी चीनला प्रत्येक गोष्ट फेटाळायची सवय आहे. टॅरिफ फेटाळतात, आरोप फेटाळतात...

हुआंग : वाईट झालं... पण सर, प्रेम ही खासगी बाब आहे.

ट्रम्प : खासगी? जेनसन, आजकाल खासगी काहीच नसतं. तुमचा फोन, तुमचा डेटा, तुमचं प्रेम... सगळं राष्ट्रीय सुरक्षेचा विषय आहे.

हुआंग : आता मी काय करू?

ट्रम्प : डोन्ट वरी. मी तुमच्या पाठीशी आहे. एनव्हिडियाला माझी गरज आहे आणि मला एनव्हिडियाची! प्रेम प्रकरणातूनही अमेरिकेला फायदा झाला पाहिजे...

हुआंग : म्हणजे सर, तुम्ही मला वाचवताय की एनव्हिडियाला?

ट्रम्प : अमेरिका फर्स्ट, जेनसन! बाकी सगळं सेकंडरी. अगदी प्रेमसंबंधसुद्धा!

हुआंग : सर, माझ्या खासगी आयुष्याची चौकशी सुरू आहे. पण तुमच्या एपस्टिन फाइल्सचं काय? त्या अजूनही ‘क्लाऊड’मध्येच आहेत...

ट्रम्प : जेनसन, डोन्ट गो देअर! माझ्याकडे जगातले सर्वोत्तम वकील आहेत.

हुआंग : सर, माझ्या संबंधांवर राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आणि तुमच्या एपस्टिन कनेक्शनवर मात्र राष्ट्रीय मौन का?

ट्रम्प : कमॉन जेनसन... कारण मी अध्यक्ष आहे!

हुआंग : हम्म... अमेरिकेत काही गोष्टी आर्टिफिशियल इंटेलिजन्सने चालतात आणि काही गोष्टी ‘आर्टिफिशियल इग्नोरन्स’ने!

ट्रम्प : जेनसन, तुमची ही चिनी कनेक्शनची गोष्ट काही साधीसुधी नाही. यू नो, इटस्‌ अ चीप लव्ह स्टोरी. मेक लव्ह, नॉट वॉर! लक्षात ठेव. अमेरिकेत प्रेम करण्यासाठी स्वातंत्र्य आहे; फक्त प्रेम कुणावर करायचं, हे राष्ट्रीय सुरक्षा ठरवते!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.