काबूलची संधी साधताना..!

तालिबानसाठी भारताशी चांगले संबंध ठेवणे फायद्याचे
 India Taliban relations
काबूलची संधी साधताना..!
Published on
Updated on
- हर्ष वी. पंत

अफगाणिस्तानात सत्तेत येऊन तालिबानला चार वर्षे पूर्ण होत आहेत. दहशतवादी चेहरा म्हणून ओळख असलेल्या तालिबानशी भारताने फार जवळीक साधलेली नव्हती; मात्र मानवतेच्या आधारावर अफगाणिस्तानच्या नागरिकांना मदत करणे सुरू ठेवले होते; पण पाकिस्तानशी संबंध ताणल्यानंतर अफगाणिस्तानला जवळ घेण्यासाठी भारताकडून रणनीतीपूर्वक पावले टाकली जात आहेत. अशा वेळी चीन आणि पाकिस्तान अगोदरच तेथे बस्तान मांडून बसलेले असताना भारताला काळजीपूर्वक धोरण आखावे लागेल.

तालिबानपासून भारताने नेहमीच चार हात लांब राहणे पसंत केले होते; पण काळानुसार थोडा मवाळपणा आणत पण सावधगिरी बाळगत काबूलच्या दिशेने भारत वाटचाल करत आहे. या पार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर आणि तालिबान सरकारचे परराष्ट्रमंत्री आमिर खान मुत्ताको यांनी नुकतीच फोनवरून चर्चा केली. याद़ृष्टीने उभय देशांतील वाढते संबंध लक्षात येतील. जयशंकर यांनी फोनवरून बोलताना पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचा निषेध केल्याबद्दल तालिबान सरकारचे आभार मानले. तसेच भारत आणि अफगाणिस्तान यांच्या संबंधात कटुता आणणारे आणि गैरसमज पसरविणार्‍या खोट्या गोष्टींवर लक्ष देत नसल्याचेही तालिबानने यावेळी सागितले. अलीकडच्या काळात पाकिस्तानकडून सातत्याने खोटे आरोप केले जात असताना उभय देशांतील संबंधातील स्पष्टता महत्त्वाची आहे. भारताची सुरक्षा चिंता तालिबानने समजून घ्यायला हवी, अशी भारताची इच्छा आहे. अफगाणिस्तानात मानवीय मदत आणि विकासकामांत भारत सहकार्यदेखील करत आहे. यावर्षी जानेवारीत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी दुबईत आमिर खान मुत्ताकी यांची भेट घेतली होती. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध बिघडलेले असताना ही भेट झाली होती. कारण, डिसेंबर 2024 मध्ये दोन्ही देशांनी एकमेकांवर हवाई हल्ले केले आहेत. शिवाय अफगाणिस्तानच्या निर्वासित नागरिकांना मायदेशी पाठविण्याबाबत पाकिस्तानने स्वीकारलेले धोरणदेखील तालिबानची नाराजी ओढवून घेणारे ठरले.

अलीकडच्या काळात काबूलमध्ये पाकिस्तानचे अस्तित्व कमी होताना दिसत आहे आणि ही बाब भारताच्या पथ्यावर पडणारी आहे. त्यामुळे अफगाणिस्तानशी आणखी जवळीक साधण्याची आणि भारतीय उपखंडात सुरक्षाविषयक हितांना जोपासण्यासाठी भारताला संधी मिळाली आहे. अशा स्थितीत चाबहार बंदराला आणखीच महत्त्व आले आहे. हे महत्त्व केवळ व्यापारासाठीच नाही, तर या माध्यमातून अफगाणिस्तापर्यंत भारताची मदत पोहोेचू शकते आणि साहजिकच पाकिस्तानवर गरजेपेक्षा अधिक असणारे काबूलचे अवलंबित्व कमी होऊ शकते. भारताने तालिबानशी संबंध वाढविले असले, तरी अन्य देशांनी या आघाडीवर अगोदरच बाजी मारलेली आहे. रशियाने अलीकडेच तालिबानला दहशतवादी संघटनेच्या यादीतून तात्पुरत्या रूपात वगळले आहे. इराण आणि मध्य आशियातील देश कझाकिस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि ताझकिस्ताननेदेखील तालिबानशी संपर्क वाढविला आहे. तालिबानही या बदलत्या वातावरणाचा लाभ घेत आहे. आपले परराष्ट्र धोरण हे तटस्थ आणि स्वहित साधण्यावर असल्याचे तालिबानकडून वारंवार सांगितले जात आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष झालेला असताना तालिबानने दोन्ही देशांशी चांगले संबंध असल्याचे सांगत परस्पर चर्चेतून मुद्दा निकाली काढावा, असे आवाहन केले. भारत आण पाकिस्तान यांच्यातील अलीकडचा तणाव पाहता चीन हा इस्लामाबाद आणि काबूलला एकत्र आणण्याचा प्रयत्न करत असेल, तर नवी दिल्लीसाठी ही बाब चिंतेची राहू शकते. तालिबानसाठी भारताशी चांगले संबंध ठेवणे फायद्याचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news