Domestic politics | घरगुती राजकारण

Domestic politics |
Domestic politics | घरगुती राजकारण
Published on
Updated on

कमल : आलीस का गं सूनबाई, घड्याळात बघ जरा किती वाजले?

सूनबाई : तुम्हाला वेळेवर आठवण होते हो घड्याळाची; पण तुमचे काही वेळेवर कामच होत नाही घड्याळात पाहिल्याशिवाय...

कमल : घड्याळ तुझ्याच मनगटावर आहे. घरातील एक तरी घड्याळ दुरुस्त आहे का? म्हणून तुलाच विचारावे लागते.

सूनबाई : ते म्हणजे असे झाले, तुझे माझे जमेना आणि घड्याळात पाहिल्याशिवाय काही होईना. हा हा हा...

कमल : हसण्यावर घेऊ नको हो. कमल म्हणतात मला. सासू आहे तुझी. देशात-परदेशात अशी सासू शोधून सापडणार नाही.

सूनबाई : हो. जिल्हे आणि पंचायती बघा आधी. निघाल्या देशाचं बघायला. कितीही शिका, वेळा सांभाळा, पसारा आवरा, तरी तुम्हीच बरोबर. आम्ही चूक. घरची, जिल्ह्याची, तालुक्याची, सगळ्यांची मतं तुमच्याच बाजूने...

कमल : कमल म्हणतात मला. लक्षात ठेव.

सूनबाई : किती प्रचार कराल. सासू-सुनेची युती असेल तर घराचा, कुळाचा उद्धार होतो.

कमल : प्रचार करत नसते मी. माझ्या पक्षात अखंड घर आहे. तू जर नीट वागत नसशील तर काही नाही फरक पडत मला.

सूनबाई : अहो, सासुबाई राजकारण नका आणू मध्ये. माझ्याशिवाय कोण आहे हातभार लावायला आपल्या घराला. काय तो पसारा, नुसते घोटाळे करता तुम्ही...

कमल : मी असेन घोटाळेबाज. घरासाठी काम करताना होतात घोटाळे. तू काय घरावर नांगरच फिरवणार घोटाळे सावरते थांबा म्हणून. आली मोठी...

सूनबाई : नांगर तुम्ही लपवले आहे. तुम्ही केलेले घोटाळे निस्तरा. मला नका हाका मारू सारख्या, सूनबाई किती वाजले म्हणून?

कमल : जा घड्याळ घेऊन तुझे तिकडे. मी एकटी बस आहे माझ्या घराला. साधी वेळ विचारली तर अंगावर येतेय.

सूनबाई ः 12 वाजले. काय करणार विचारू? दिवे तर लावलेच आहेत, मेणबत्त्या पण लावलेत सगळीकडे. रिकामी ताटे. वाजवायची का या कँडल लाईटमध्ये? जेवण कुठे आहे?

कमल : ते खाते तुझे.

सूनबाई : माझे? सगळा घाट तुम्ही घातलात. सत्ता तुमच्या हाती. मी शिजवायचे, मी भरवायचे, छान हा सासुबाई. तुम्हाला जिल्ह्याची पंचाईत. घरची नाही.

कमल : किती गं हुशार तू. जा जरा बॉम्ब घेऊन ये. लावते...

सूनबाई : घ्या! तो पण मीच आणायचा का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news