Tadaka Article | निकाल...

Tadaka Article | निकाल...
Tadaka Article Result...
Published on
Updated on

बजा : रंगा तुतारी वाजवायची राह्यली बघ. काय ते गुण चांगले नाही मिळाले तुला.

रंगा : तुझी वाजली ना! बस

बजा : आम्ही वाजवत नसतो. आम्ही फुले उधळतो. हार-तुरे स्वीकारतो, देतो.

रंगा : उगाच काय खेचता राव गरिबाची. जा ना सरळ वाटेने.

बजा : वाटच वाकडी आहे तेला आम्ही काय सरळ करणार?

रंगा : मग तुम्ही चाला वाकड्या चाली.

बजा : दादा गेल्यापासून मजा नाही राहिली. काय मार्क नाही मिळत आता त्या ताईला. शिकवणारा दादा गेला, सगळा उत्साह गेला. परीक्षेत पास झाली; पण माझ्याइतके मार्क नाही भेटले. उगाच चढाओढ नुसती.

रंगा : तुमचा कोण हात धरणार? कॉपी करून पास होणार. अख्खे परीक्षा केंद्र हायजॅक केले तुम्ही. ताई लय हुशार आहे. परीक्षेची गरज नाही त्यांना. बिनपेपरच्या पास होतील. काय त्यात!

बजा : बरोबर आहे. टाईम, वेळ, काळ काही पाळत नाही. पेपर लिहायचा प्रश्नच येत नाही. उत्तरे तयार असतात मात्र त्यांची.

रंगा : त्या बाणाचा बोरू म्हणून वापर करतील पेपर लिहिताना.

बजा : आणि काय तुतारीचा दौत करतील?

रंगा : दौत लागत नाही त्यांना. त्यांचा बाण अचूक उत्तरावर जातो आपोआप.

बजा : आम्हीच येडे. परीक्षा केंद्र ताब्यात घेऊन पेपर लिहिला मार्क मिळवायला. यांचे मार्क पण आधीच तयार.

रंगा : आता बरोबर समजला तुम्ही. थोडक्यात! असो. तुझे काम फत्ते झाले ना? मग माझी नको वाट अडवू.

बजा : जा ना राजा... हो पुढे. चढाओढ तर होतच राहील. तूर्तास हो पुढे!

रंगा : हो, मागून खेचायला बरे तुम्हाला. आमचे यावेळी आमच्या पाठीकडेही लक्ष असेल. पाठ फिरली, तरी हे ध्यानात असूद्या...

बजा : तुम्ही फक्त स्वतःच्या पाठीची राखण करा. खूप कॉपी केलीत पाठ झाकून घ्या. आम्हाला दिसेल आणि तुमची उत्तरे फुटतील. पेपर आमचा सोपा होईल. हा हा हाऽऽऽ

रंगा : वाह! आयत्या पिठावर रांगोळी तुम्हीच काढावी; पण रांगोळीचे रंग आमच्याकडे आहेत.

बजा : आम्ही फुलांनी रंग भरू. नका तुतारी वाजवू...

रंगा : अहो, वाजून कशी चालेल? कोणाला येते वाजवता? पूर्वीपासून वागवत आलो म्हणून तुतारीचा मान.

बजा : वाजवा आता. काय बोलणार..!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news