

राजाबाबू : अरे उद्धटा, आपल्या युतीमुळे भले भले गप झाले; मग हा माणूस का पोपटपंची करत आहे.
उधोबाबू : हे बरं नाही झालं. त्यांचे दादा गेले हे सहन नाही होत आहे त्यांना. आपल्यावर दात-ओठ खाणारच ते. आपलं कर्तृत्व कोणाला समजलं? तू तर गूढ उकलण्याच्या नादात स्वतः एक राज की बात होऊन बसलास.
राजाबाबू : तू प्रशंसा करतोस की निंदा?
उधोबाबू : ते नंतर सांगतो. आदित्य बाळा कोणाची कळ काढलीस आज?
विक्रमादित्य : काही नाही. सभागृहाबाहेर त्या बाईंना चिडवलं आज. भारी वळून बघत होत्या आणि चिडून निघून गेल्या.
राजाबाबू : ती पोकळ बांबू आणायला गेली असेल. जा लप जा. आम्ही सांगत नाही तोवर खोके-बुके असले डोके नको चालवू.
विक्रमादित्य : काका पण गॉसिप करायला काय हरकत आहे. ते पण करतातच ना.
राजाबाबू : युती आहे, त्यामुळे समजावत आहे. नाहीतर मीही बांबू आणला असता.
विक्रमादित्य : जातो जातो; पण मला जाम मजा येते चिडवायला. मी चिडवणार.
उधोबाबू : तुझं लगीन व्हायचंय अजून. नको पडू या फंदात.
विक्रमादित्य : बाबा लगीन बिगिन नाही.
राजाबाबू : रताळ्या नको चालवू डोकं.
उधोबाबू : आमची महत्त्वाची चर्चा आहे.
विक्रमादित्य : बरं मग सभागृहात बोलू.
राजाबाबू : अरे ये उद्धटा. तिथे नको बोलू.
विक्रमादित्य : मग मी बोलायचंच नाही का काही.
राजाबाबू : शिवशक्ती एकत्र असताना तुझा तांडव कशाला?
विक्रमादित्य : नाहीतरी तुमचा आकांडतांडव असतोच नेहमी.
राजाबाबू : तो बाळासाहेबांकडून थेट आला आहे माझ्यात. याला रोखठोकपणा म्हणतात. आकांडतांडव नाही.
विक्रमादित्य : ते कॅरम आणि गोटी प्रकरण काय आहे मग? ते का रोखठोक नाही बोलत.
राजाबाबू : वो राज की बात है. राजकारण आहे हे. बोलतो आम्ही काहीही.
उधोबाबू : अरे राज! पण युती झालीय आपली. राज आणि राजकारण आता नको. सगळं स्पष्ट हवं. राज म्हणजे गूढ असं म्हणायचंय. तू हवास अजून आम्हाला. हाहाहा.
राजाबाबू : घ्या! (कपाळावर हात मारत) बेटा तसा बाप!