Tadaka article | चूलबंद हॉटेल

Tadaka article |
Tadaka article | चूलबंद हॉटेल
Published on
Updated on

शांता : कांता, कुठं चाललीस इतक्या घाईघाईत?

कांता : गॅस सिलिंडरमुळे खूप टेन्शन आलं गं!

शांता : तुझ्याकडे जास्तीचं सिलिंडर नसतं का?

कांता : शेजारच्या बाईला दिलं मी. आता गॅस संपला तर वांदेच... तुझ्याकडे आहे का गं जादाचं एखादं सिलिंडर?

शांता : नाही गं! मी गावी आले त्यासाठी. माहेरी जास्त माणसं. त्यामुळे जादाचं सगळं असतं इकडे. म्हणून मुलांना घेऊन आले माहेरी. चार दिवसांत येईन तिकडे तेव्हा देईन, यांनी घेऊन ठेवलं असेल तर.

कांता : मग मी विचारू का भाऊजींना?

शांता : हे किती चिक्कू! हजार कारणं पुढं करतील. आल्यावर देईन मी. तोपर्यंत चुलीवरचं मटण मिळतं ते हॉटेल आहे की.

कांता : अगं ते हॉटेल बंद आहे चार दिवस. मी आता फ्लॅटमधे चूल मांडायची म्हणते. पहिले दिवस आले गं बाई!

शांता : हो. पण ती चूलबंद असलेली हॉटेलं गॅसवरच चालतात हे समजून जा.

कांता : हो गं! माझ्या हे लक्षातच आलं नाही मेलीच्या!

शांता : चार दिवस शांतच राहिले पाहिजे.

कांता : शांताबाई, तुमच्यासारखं मला माहेरी नाही जाता येणार. कारण माझेच माहेरचे इकडे येणार आहेत.

शांता : छान! काय करणार आता मग? तुला सिलिंडर वाटप कोणी करायला सांगितलं होतं. सरकारी कामाचं खासगीकरण करायला गेलं की असंच होणार. एक वेळ सोनं दे बाई शेजारणीला स्वस्त झालं म्हणून. पण सिलिंडर जपून वापर. ठेवते फोन. काळजी घे. बाय!

कांता : (पुटपुटत) कशाला करायचा बिनकामाचा फोन. जळवायला! चला भंडार्‍यातच जेवलेलं बरं चूल बंद ठेवून.

शांता : अगं भंडारे पण बंद आहेत. मग कशाला मी आले असते इकडे? फोन कट कर. चालूच आहे. वेंधळा कारभार नुसता. बाय. बंद कर नीट फोन आता तरी.

कांता : तू बंद केलास तरी चालेल. उगाच वाट बघायची कशाला ती. (अचानक काहीतरी आठवून खोट्या सुरात) अगं बाई! तुमचं दार बंद आहे म्हणून सिलिंडर दरवाजात ठेवून उभे आहेत सिलिंडरवाले. मी ठेवून घेते. काळजी नको करू. बरं झालं बाई. सिलिंडर मिळालं. तशी तू गावीच आहेस. तू येईपर्यंत माझे येईल सिलिंडर. चल बाय. थँक्स. फायनली ठेवते फोन.

शांता : अगं ये थांब. कट नको करू. हॅलो... हॅलो...अगं बाई. हिने ठेवला फोन. ट्रम्प, तुला आग लागो लवकर...!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news