Tadaka article | बागेतली पुस्तके

Tadaka article |
Tadaka article | बागेतली पुस्तके
Published on
Updated on

जोशी : आले का हो तुमचे राजे? त्यांनीच बागेमध्ये बोलावलं आणि तेच नाहीत अजून? पुस्तकं छान मांडलीत. वाचकही खूप दिसतात. हे प्रदर्शन गाजणार. राजे आले पाहिजेत वेळेवर.

काशी : मौज आहे पण तुमची. या पुस्तकाच्या बागेत बॅगवाले कमी, पण गँगवाले जास्त दिसतील. ज्यांचे वाचन कमी, उचापती जादा. तुमची प्रकाशन संस्था जोरदार आहे अशा लोकांच्या खिदमतीसाठी. हवे तसे लिहून घेता आपण लेखकांकडून. गँगवाल्यांसाठी.

जोशी : वाचकांची संख्या लक्षात घेता कशावर लिहिलं तर पुस्तकांचा खप होईल यावर अभ्यास आधी झाला पाहिजे.

काशी : आमचं आपलं हातचं राखून काही नसतं. जे आहे ते दिसलं पाहिजे लिखाणातून. असेच लेखक वेगळे लिहू शकतात. चार पैसे कमी मिळाले तरी चालतील. पण आमची संस्था उत्तम दर्जाची पुस्तके प्रकाशित करते. तुम्ही विचारशैली बदलली पाहिजे जोशी.

काशी : अहो, त्या बघा मधूबाई. बाईंनी कशाला मध्येच घुसायचं पुस्तकाच्या बागेत. राजकारण आहे नुसतं तिचं. अहो, कशाला लोकांची थट्टा करणारी पुस्तकं छापायची त्यांनी. गर्दी बघा ती. ते पुस्तक तिने हल्ली प्रकाशित केलं. अशा लेखकांची का बरं पुस्तकं छापत असेल ही ज्यांना ते जमतच नाही.

जोशी : तुमच्या नाकास का मिरच्या झोंबल्या? छापा अशी पुस्तके. अडवतो कोण? राजे येऊदेत. त्यांस विचारा, का अशा पुस्तकाला प्रदर्शनात स्थान दिला ते...

काशी : कशाला? ते आले की पाहणी करतील - जातील. हे त्यांचे काम नाही.

जोशी : राजे परखड बोलणारे आहेत.

काशी : हे बघा. येत आहेत राजे. वेळेवर येतील तर राजे कसले. बोला आता.

जोशी : मी काय बोलू. तुम्ही विचारा.

राजे : काय चालू आहे? देशात खळबळ?

काशी : (गोंधळून) नाही. बागेत फळांना बहर आला ते दाखवत होतो.

राजे : हं..! चुकून खाल ती फळं. शिव्या खाल. चला. बागेत राजकारण नको. त्या मधूबाई बघा. स्टॉल कसा गजबजलाय. काय गर्दी आहे तिथे...

जोशी : केलीस काशी? भोग कर्माची फळं. मधूबाईनं चांगलाच छाप पाडला. चला.

काशी : तुम्ही सोबत आलात तर बरं होईल. छापा काटा करू.

जोशी : आता तुला कसा मारू... नको ना रे कोट्या करू. आलिया भोगासी असावे सादर. चल बाबा...

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news