Global warming | तापमानवाढ आणि अस्वस्थ भविष्य

Global warming |
Global warming | तापमानवाढ आणि अस्वस्थ भविष्य
Published on
Updated on

डॉ. अविनाश भोंडवे

वाढत्या जागतिक तापमानाचे परिणाम मानवी आरोग्य, अन्नसुरक्षा, सामाजिक जीवन आणि संपूर्ण जैवसृष्टीवर त्याचे गंभीर परिणाम दिसू लागले आहेत.

जागतिक पातळीवर यावर्षी तापमान खूप वाढले आहे. ‘ग्लोबल वॉर्मिंग’साठी कारणीभूत असलेल्या अल निनो या समुद्रप्रवाहाचे तापमान दोन अंशाने वाढण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात होत असलेली वृक्षतोड, काँक्रीटचे रस्ते, ओव्हरब्रिजेस, वातानुकूलन आणि इतर यंत्रांद्वारे होणारे उत्सर्जन अशा असंख्य कारणांमुळे उन्हाळा अधिक तीव्र आहे. वाढत्या तापमानाचे परिणाम सार्‍या सजीवसृष्टीवर होत आहेत. हे परिणाम फक्त पर्यावरणीय न राहता सार्वजनिक आरोग्याशी निगडित आहेत.

आरोग्याशी संबंधित धोके

तीव्र उष्णतेचे किरण शरीरावर त्वरित परिणाम करतात. उष्माघात, निर्जलीकरण अशा शारीरिक स्थिती प्राणघातक ठरू शकतात. उष्णतेचा संपर्क दीर्घकाळ राहिल्यास हृदयविकार, रक्तदाब वाढणे आणि कमी होणे, तसेच मूत्रपिंडांवर ताण वाढू शकतो. उच्च तापमानामुळे शरीरातील द्रवपदार्थ आणि क्षार यांचे संतुलन बिघडते. परिणामी आजारातील गुंतागुंत वाढते.

उष्ण आणि आर्द्र हवामानामुळे माश्यांचे प्रजनन वाढते आणि त्या नवीन भौगोलिक प्रदेशात पसरतात. माश्यांपासून उद्भवणार्‍या आजारांविरुद्ध प्रतिकारक क्षमता त्या ठिकाणी कमी असते. परिणामी मलेरिया, डेंग्यू, झिका आणि लाईमसारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. वाढती उष्णता आणि हवेचे जमिनीच्या पातळीवरील बदलते स्थैर्य यामुळे वातावरणातील ओझोन कमी होतो आणि इतर प्रदूषके वाढतात. हवेच्या खराब गुणवत्तेमुळे अस्थमा, क्रॉनिक ब्रॉन्कायटिस, सीओपीडी व हृदयविकारांचे प्रमाण आणि त्यांची तीव्रता वाढते. उष्णतेच्या लाटा आणि प्रदूषण या दोन्हींमुळे रुग्णालयांमध्ये दाखल व्हावे लागणार्‍या लोकांची संख्या वाढते. श्वसनविकार तसेच हृदय आणि रक्तवाहिन्यांचे आजार असलेल्या लोकांसाठी सार्वजनिक आरोग्य धोरणांमध्ये हवेच्या गुणवत्तेची नित्य माहिती, त्याचे नियंत्रण आणि त्याबाबतची जनजागृती यांचा समावेश आवश्यक आहे.

अन्न आणि पाण्याची सुरक्षितता

पिकांचे वाढीचे चक्र, मातीची आर्द्रता आणि कीटकजन्य रोगांमुळे शेतीचे उत्पन्न कमी होते आणि अन्नधान्याची गुणवत्ता घटते. पाण्याच्या उपलब्धतेतील घट किंवा दूषित पाण्याचा प्रसार वाढल्याने पिण्याच्या शुद्ध पाण्याची उपलब्धता कमी होते. त्यामुळे कुपोषण, बालकांमध्ये शारीरिक वाढ खुंटणे असे परिणाम वाढतात. आफ्रिका आणि आशियातील संवेदनशील प्रदेशांमध्ये हे दिसून येते.

स्थलांतर

समुद्रपातळीची वाढ, किनारपट्टी मागे हटणे आणि पर्यावरणीय प्रकोपामुळे लोकांना स्थलांतर करावे लागते. परिणामी त्यांच्या उपजीविकेची साधने नष्ट होतात, सामाजिक संबंध तुटतात आणि शहरी तसेच ग्रामीण पायाभूत सुविधांवरचा ताण वाढतो.

संवेदनशील गटांवरील परिणाम

वृद्ध आणि शिशू : शरीरातील तापमान नियंत्रित करण्याची क्षमता कमी असल्याने लहान मुले आणि वृद्ध व्यक्ती उष्णतेच्या ताणाला अतिशय संवेदनशील असतात. त्यांना त्वरित थंड वातावरण, अधिक प्रमाणात द्रवपदार्थ आणि वैद्यकीय मदत आवश्यक असते.

किनारपट्टी : समुद्रपातळीतील वाढ आणि किनारे मागे हटल्यामुळे समुद्र किनारी असलेल्या लोकांच्या घरांची आणि शेतीची हानी होते. दीर्घकालीन स्थलांतर आणि आर्थिक नुकसान संभवते.

शेत कामगार : शेतांवर आणि उघड्यावर कामे करणार्‍या कामगारांमध्ये उष्णतेच्या थेट संपर्कामुळे कामाची क्षमता कमी होते.

सामाजिक परिणाम

उष्णतावाढीमुळे लोकांच्या दैनंदिन सामाजिक व्यवहारात आणि समुदायातील परस्परसंवादात मोठे बदल दिसून येतात. सार्वजनिक कार्यक्रम, उत्सव, लग्न, समारंभ त्याचप्रमाणे बाजारपेठा कमी प्रमाणात किंवा वेगळ्या स्वरूपात आयोजित कराव्या लागतात. त्यामुळे स्थानिक संस्कृती आणि सामाजिक संबंधांवर परिणाम होतो. स्थलांतर आणि आर्थिक नुकसानीमुळे कुटुंबे विखुरली जातात, सामाजिक पाठबळ कमी होते आणि एकाकीपणा व मानसिक ताण वाढतो. शहरी भागात थंड जागांची कमतरता आणि सार्वजनिक शीतलता केंद्रांची अनुपलब्धता सामाजिक असमानता वाढवते. यामुळे गरीब आणि संवेदनशील गट अधिक वेदनादायी ठरतात.

प्राणिजगताचे काय?

प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासात बदल होतात. अनेक प्रजातींना पारंपरिक प्रदेशातून स्थलांतर करावे लागते किंवा त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होतो. समुद्री प्राण्यांसाठी पाण्याचे तापमान आणि आम्लता बदलल्याने खाद्यसाखळी बिघडते. त्यामुळे मासेमारीवर आणि समुद्री परिसंस्थेवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. स्थलांतर करणार्‍या प्राण्यांमुळे नवीन प्रदेशात रोगांचा प्रसार वाढतो तसेच मानव-प्राणी संघर्षाचे प्रमाणही वाढते.

वनस्पती सृष्टी

वाढते तापमान आणि पर्जन्यातील अनियमिततेमुळे पिकांच्या वाढीचे चक्र, मोहोर किंवा फूल येण्याच्या वेळा आणि परागीभवनाच्या प्रक्रियेत बदल होतात. त्यामुळे कृषी उत्पादनात अनिश्चितता आणि उत्पन्नात घट येते. काही प्रजाती उष्णतेला अनुकूल होऊन वाढतात, तर इतर संवेदनशील प्रजाती नष्ट होतात. त्याचा जैवविविधतेवर परिणाम होतो. मातीची आर्द्रता कमी होणे आणि कीटकजन्य रोगांची वाढ, शेतीसाठी आणि नैसर्गिक वनस्पतींसाठी त्रासदायक ठरते. वनस्पतींच्या बदलत्या पॅटर्नमुळे अन्नसाखळी, जलचक्र आणि कार्बन शोषणाच्या प्रक्रियांवर दीर्घकालीन परिणाम दिसतात.

भविष्यातील द़ृष्टिकोन आणि उपाय

तापमानवाढीत हस्तक्षेप न केल्यास 2030 च्या दशकापर्यंत कुपोषण, मलेरिया आणि उष्णतेमुळे दरवर्षी होणारे मृत्यू वाढतील. ते कमी करण्यासाठी हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी जलद आणि विस्तृत प्रमाणावर पावले उचलणे, सार्वजनिक आरोग्य प्रणाली मजबूत करणे, संदेश आणि धोक्याच्या सूचना देणारी प्रणाली, शहरी नियोजन, पाणीसाठा आणि अन्नसुरक्षा कार्यक्रम वाढवणे गरजेचे ठरते. त्यासाठी जनता, सरकार, आरोग्यसंस्था आणि आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये समन्वय आवश्यक आहे. थोडक्यात, उष्णतेच्या वाढीचे परिणाम बहुआयामी आणि परस्परसंलग्न आहेत. त्यात वैयक्तिक आरोग्यापासून सामाजिक आणि आर्थिक संरचनांपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश होतो. त्वरित आणि समन्वयित कृती न आचरल्यास या परिणामांचे प्रमाण आणि तीव्रता वाढत राहील. स्थानिक पातळीवरील जागृती वाढवणे आणि जागतिक पातळीवर उत्सर्जन कमी करणे या दोन्ही गोष्टी एकत्र आल्यास भविष्यातील धोके कमी होऊ शकतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news