

शशिकांत सावंत
महानगरांच्या विकासाच्या धुरात नागरिकांचा श्वासच गुदमरू लागला आहे. मुंबईसह देशातील शहरांमध्ये वाढते वायुप्रदूषण केवळ आरोग्याचे नव्हे, तर कोकणच्या पर्यावरणीय भवितव्याचेही गंभीर संकट बनत आहे.
प्रदूषित जगातील महानगरांमध्ये मुंबईसारख्या महानगराचाही आता समावेश आहे. भारतातील बरीच शहरे यात समाविष्ट झाली आहेत. त्यामुळे महानगरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यापुढे गंभीर धोक्याची घंटा वाजत आहे. हवेत मिसळणारे पीएम ते अतिसूक्ष्म कण श्वासातून फुप्फुसात पोहोचत असल्याने कोट्यवधी लोकांचे आरोग्य कंठाशी येते आणि तेव्हा प्रश्न उभा राहतो, यावर उपाय काय?
आपल्या कोकण विभागाचा विचार केला तर महामुंबई हा या प्रदेशाचा अविभाज्य भाग आहे. कोकणातील घरघंटी दोन लोक तरी मुंबईत आहेत. त्यामुळेच मुंबईच्या प्रदूषणाचा मुद्दा कोकणच्याही अस्तित्वाचाही मुद्दा झाला आहे. आयआयटीने उपग्रहाच्या सहाय्याने केलेल्या पाहणीत मुंबईसारख्या महानगरात एम. २.५ चे सूक्ष्म कण हे वाढत असल्याचा आवाज दिला आहे. मुंबईबरोबरच प्रदूषित शहरांमध्ये मुंबई, दिल्लीसह श्रीगंगानगर (राजस्थान), रोहतक (हरियाणा), श्रीनगर (जम्मू-काश्मीर) बठिंडा (पंजाब), सिरसा (हरियाणा), उमेरठ (उत्तर प्रदेश), हापूड (उत्तर प्रदेश) बुलंदशहर (उत्तर प्रदेश), फरीदकोट (पंजाब), सोनीपत आणि पानिपत (हरियाणा), बल्लभगढ (हरियाणा), ग्रेटर नोएडा आणि मुझफ्फरनगर (उत्तर प्रदेश) या शहरांचा समावेश आहे. या प्रदूषणाचे मुख्य कारण वाढती बांधकामे, पेट्रोलियमची वाहतूक व डिझेलच्या वाहनांचे कर्बोत्सर्जन, झाडांची मोठी तोड, अशा अनेक घटकांमुळे प्रदूषण वाढले. तसेच दिवाळीत फटाक्यांमुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
दिवाळीत फटाक्यांमुळे निघणारा प्रचंड धूर वर्षभरांच्या वाहन प्रदूषणाइतका भीषण हाेता. फटाके बंदी घालूनही त्याचा काही उपयोग झाला नाही. या प्रदूषणामुळे फुप्फुसापर्यंत इन्फेक्श्न पोहोचून दहा टक्के मुंबईकर रुग्ण त्यामध्ये दाखल झाल्याची आरोग्य विभागाची आकडेवारी आहे. खरं तर शहरांमधील पी. एम. २.५ हे सूक्ष्म कण शेकडो किलोमीटर प्रवास करू शकतात. त्यामुळे हे प्रदूषण या शहरांपुरतेच मर्यादित न राहता आजूबाजूला २५ कोसापर्यंत पसरू शकते, असे शास्त्रीयदृष्ट्या सांगितले जाते. प्रदूषणामुळे दर मिनिटाला तीन ते चार लोक बळी जातात. हा जागतिक आकडा आहे. दर तासाला हा आकडा आहे. हा आकडा २८८ तर एक दिवसाला ५,५०० पर्यंत यातून मृत्यू होत असल्याचे सांगितले जाते.
दिवाळीत मुंबईत ३०० कोटींपेक्षा जास्त फटाक्यांची उलाढाल झाली. हे सर्व फटाके रस्त्यांवर फुटले. त्यांचा दणदणाटी आवाज कानांनाही इजा पोहोचवून गेला. या विषारी हवेमुळे माणसाच्या केसापासून पायापर्यंत सर्वत्रच परिणाम होतो, हे वैद्यकीय शास्त्रातील अनुमान आहे. याबाबत तज्ज्ञ डॉक्टर सांगतात. मुंबईसारख्या महानगरातील प्रदूषित हवा एकूण मानवी आयुष्यावर दूरगामी परिणाम करत आहे. एका बाजूला पर्यटनाच्या कक्षा रुंदावण्यासाठी कोकणात ब्ल्यू फ्लॅग मानांकनाची झळाळी मिळाली आहे. या जागतिक मानांकनामुळे किनारपट्टी पर्यटनाला नवी आशेची किरणे सापडू लागली आहेत. दुसऱ्या बाजूला येथील ऐतिहासिक वास्तूंना जागतिक वारसास्थळांचा मान मिळाला आहे. यामध्ये कोकणातील पाच किल्ल्यांचा समावेश आहे. तर, तिसऱ्या बाजूला पश्चिम घाटाला जागतिक जैवविविधतेचा हॉट स्पॉट म्हणून गौरविले गेले आहे. या सकारात्मक गोष्टींच्या मानांकनानी कोकणची बाजू उजवी ठरत असताना हवेतील प्रदूषण, नद्यांच्या पाण्याचे प्रदूषण कचऱ्यातून होणारे प्रदूषण यामुळे नकारात्मक कृतीही घडत आहे. त्यामुळे या प्रदूषणाच्या मुद्द्याकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.
धूर, श्वसनामुळे शहरात निर्माण होणारे आजार सध्या वाढत आहेत. कार्बन मोनाॅक्साईड आणि इतर रसायनांनी युक्त झालेला धूर फुप्फुस आणि हृदयावर आघात करत आहे. डोळ्यांनाही इजा पोहोचवत आहे. त्यामुळे माणसाचे शरीरच कमकुवत करणारे असे हे प्रदूषण आहे. एका बाजूला आपला देश तरुणांचा असल्याचे अभिमानाने सांगतो, तर दुसऱ्या बाजूला प्रदूषणाच्या विळख्यात ही शक्ती वाया घालवतो. या विरोधाभासावर आपल्याला अधिक गंभीरपणे पाहायला हवे.