Tadaka article | राखी, रेखा, जया..!

Tadaka article |
Tadaka article | राखी, रेखा, जया..!
Published on
Updated on

राखी : हाय पापाराझी! कसे आहात सगळे?

पॅपस : आम्ही ठीक. जरा पाठीमागे साईडला वळा.. नाईस. डावीकडे राखीजी.. नाईस पोज.

राखी : मी पोज छानच देते, समजले? जया नाही आहे मी. समजलं का?

पॅपस : राखीजी रेखाबद्दल काय मत आहे? त्यांची मिमिक्री करा ना!

राखी : मी राखी आहे. जॉनी लिव्हर नाही. रेखाजींसोबत अमिताभजींनी लगन करायला पाहिजे होते. लगन करा म्हणून बच्चनना सांगणार आहे मी लगेच.

पॅपस : जयाजी आमचा कॅमेरा दिसला की, रागाने नागिणीसारख्या बघत राहतात एकटक.

राखी : मग, बिन घेऊन जायचा ना.

पॅपस : आपल्या विनोदबुद्धीवर आम्ही जाम खूश आहे. एक सांगा, जयाजींचे वागणे तुमच्यासोबत कसे असेल, समोर आल्या तर?

राखी : मला बोटोक्स आवडत नाहीत. त्या नेहमी रागात वाटतात. मी त्या दिसल्या, तरी बाजूने निघून जाईन.

पॅपस : पण, त्यांनी बोटोक्स कधी केले?

राखी : तू इंटरव्ह्यू घेतो सारखा म्हणून केली असेल. काय एकेक नमुने आहात तुम्ही. अरे बाबा, नसेल केले तरी दिसते तसे. आम्ही बोटोक्स केलेले जसे दिसतो तसेच! मी नाही घाबरत कुणाला. येऊदे समोर. तू पण बोल..

पॅपस : आम्ही काय बोलणार त्यांना. म्हणून तुम्हाला विचारतो. तुम्ही बोटोक्समुळे अशा दिसता... असूदे.

राखी : ऍ? मी म्हातारी दिसते? घोर अपमान. तुम्ही हे त्यांना बोलून बघा...

पॅपस : त्या समोर आहेत असे समजा.

राखी : घाबरते की काय राखी. आणच आता समोर त्यांना. राखी आहे मी. आजपर्यंत कधी कोणाला राखी बांधली नाही, तरी भाई मानते मी बॉलीवूड स्टार्सना. पाठी बोलत नाही. मीडियासमोर बोलते मी.

पॅपस : जया आम्हाला बोलतात. तुम्ही बोला. यात रेखा मात्र मुद्देसूद बाजूला राहतात.

राखी : तुमची दोन्ही बाजूंनी ढोलकी वाजते. बरे झाले, रेखा तुम्हाला हात दाखवून पळून जातात. कधी कधी त्या मेकअप दाखवतात आणि निघून जातात. आम्ही बिचारे बोटोक्स दिसावा म्हणून चेहर्‍यावर किती ताण देऊन बोलतो. तुम्हाला आमचा राम राम!

पॅपस : बोलो सुबह शाम. हरे कृष्ण, हरे राम. राम राम मॅडम जी!

राखी : दम मारो दम... जा आता. त्यांना पण राम राम! (हात जोडते.)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news