Rajpal Yadav | राजपालची जेल यात्रा...

Rajpal Yadav jail case
Rajpal Yadav | राजपालची जेल यात्रा...
Published on
Updated on

यू ट्यूब, वृत्तपत्र सगळीकडे एकच बातमी... ‘राजपाल यादव तिहार जेलमध्ये...’ काल सोनू सूद, तर आज अजून तिघे मदतीसाठी म्हणून बॉलीवूडचे दिग्गज आले गोंजारायला. कुक्कुल बाळ गोंजारणारे बॉलीवूड दिग्गज. राजपाल बॉलीवूडचे धूड आपल्या विनोदाच्या कुबड्या घेऊन सांभाळत होता; पण टेकू चांगला होता. तो निसटला. बॉलीवूड विनोदाच्या कुबड्या न घेता कसा चालणार, ही भीती सहकार्‍यांना. भले हास्यसम—ाट निघून गेले, कालबाह्य झाले बॉलीवूडमधून; पण त्या सिंहासनाला जपता जपता राजपाल हरवला भलतीकडे. भलत्याच वादात अडकला. राज्यातून पलायन करायची वेळ आली. हताशपणे सर्व स्वीकारून चालू लागला तिहारकडे, असे क्षणभर वाटत राहिले सर्वांना ही त्याची विनोदशैली असावी. म्हणेल जोकिंग...

राजपाल मात्र तिहारच्या भिंतींना काय साक्ष द्यावी लागेल, आपल्याबद्दल तुरुंगात बंदिस्त असणारी इतर मंडळी सांगतील अभिमानाने, ‘राजपाल जेलमध्ये असताना माझा सोबती होता...’ या विचाराच्या सापळ्यात अचल विचल. यावरही विनोद करेन कधीतरी (मनात तरीही विनोदावरचा सूड); पण आता राज्य सोडावे लागले होते. ‘बॉलीवूडचा भाईजान’ सिंहासन सोडून मदतीसाठी धावला. वरुण धावत आला; पण वरकरणी तर नाही ना, अशी अजून रुखरुख ठेवून स्वतः बिनधास्त झाला. धाय मोकलून रडावे की धाय मोकलून विनोदावे तेच राजपाल विसरला. विखुरला. भावनांचा विवाद विनोदाशी करत पुढे चालत राहिला. बॉलीवूडचे दिग्गज नक्कीच काहीतरी करणार. हा एक आशेचा किरण त्याच्या विनोदाचा श्वास परत आणू पाहत होता. जिंकणार. ही फिनिक्सची झेप असणार, हे धोरण त्याने बांधलेही असेल. असो...

पहिला आला सोनू सूद! मदतीचा हात पुढे केला; पण सोनू सूदची रक्कम पण एकट्याने फेडू नाही शकणार. एवढी ढीगभर रास बाळाने करून ठेवली. बाकीचे अजून रकमेत गोंधळले. तू किती अन् मी किती करत राजपालचा खेळ वाढत चालला. बरं आता अजून ट्विस्ट अशी की, याने जाणूनबुजून केलं सगळं. मीडिया म्हणजे राजपालसाठी झाला दहा तोंडाचा रावण. शाहरूख, सलमानभाईशी बरोबरी करताना राजपाल मात्र बसला राज्य हरवून. सांगायचे एवढेच की, नको ते ऋण, नको ते सण... तिहार की त्योहार... राजपालला कसा काय सुचला विनोद यात पण!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news