Tadaka article | विसरभोळे आणि महामहीम

Tadaka article |
Tadaka article | विसरभोळे आणि महामहीम
Published on
Updated on

विसरभोळे : सभागृहात सगळ्यांच्यावर कविता करायला मज्जा येते बुवा!

महामहीम : शब्दावरून न घसरता चांगली खेचता तुम्ही.

विसरभोळे : महामहीम है तो मुमकिन है. आपली कृपा!

महामहीम: विरोधी गटाचे अध्यक्ष महोदय भाषण देऊन गेले. विषय होता तुमच्या कवितेचा. हशा पिकतो तुमच्या कवितांमुळे.

विसरभोळे : कविता म्हणजे जग असते कवीचं. आमचं जग तुम्ही आहात म्हणून तुमच्यावर कविता केली. विरोधी पक्षाला मुद्दा सापडला नसेल दुसरा भाषणाचा.

महामहीम : मुद्दे आपणच देतो एकमेकांना. हे जे बोलला ते कवितेत बोला पाहू. तुमची प्रतिभा सभागृहातल्या हशामुळे समजते. एरवी तिला ऐकायला कोण धजत असेल वाटत नाही.

विसरभोळे : असे का? बरं ऐका,

असं काय बोलता महामहीम तुम्ही...

कविता म्हणजे जग असतं कवीचं,

आमचं जग तुम्ही तुमच्यावर करतो कविता

विरोधकांकडे नव्हता मुद्दा म्हणून

माझ्यावर करतात टीका

मी म्हटलं काय हे लेका, बास कर

खर खर, गप बस आता...

महामहीम : हा हा हा. वाह छान. नावातच खरखर आहे त्यांच्या, तर त्यांना तसेच वाटणार. कोणाची स्तुती पण रखरख वाटते एखाद्याला. तुम्ही कविता छान करता राजकारणापेक्षा. बाकी तुम्ही एव्हर ग्रीन आहात.

विसरभोळे : धन्यवाद! दुसरी ऐकवतो.

देव गोड वाटला म्हणून करतात पूजा

तुम्ही महामहीम, आम्ही करतो पूजा...

राजकारणात गोडी लागली

तर त्याचा वाजतो बाजा

बाजा बाजा कशाला करतो गाजावाजा

इथं कोणी नाही वजीर नाही कोणी राजा

मी करतो कविता कुठे गेली प्रजा?

महामहीम : सभागृहातले तुमचे विनोद जनसामान्यांच्या करमणुकीत भर टाकत आहेत. तुमच्यासारखे बाजूला पडलेले पत्ते बाजी मारून जातात कधी कधी, पत्त्यातल्या जोकरप्रमाणे.

विसरभोळे : जोकर जोकर मी नाही जोकर

डर आहे ते भरतात कर...

नाही तर म्हणतात मी नाही भरणार

कर, काय करायचं ते कर...

ही येडी इडित सापडली,

पुढची पिढी रडत बसली...

बसू दे बसू दे... महामहीम आता निरोप घेतो आम्हाला जाऊ दे! (हात जोडत)

महामहीम : या आता! इडीला नका छेडू मार्च महिना आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news