

उधोसेन : राज, तू म्हटला होतास ते अगदी खरं झालं!
राजसेन : दादू, काय म्हणालो होतो रे मी?
उधोसेन : ते नाही का, निवडणुकीच्या आधी महिनाभर म्हणाला होतास.
राजसेन : अरे, ते मी मुंबईकर मराठी माणसाला म्हणालो होतो. लक्षात ठेवा ही तुमची शेवटची निवडणूक आहे.
उधोसेन : पण, निकाल बघितल्यावर तर ती आपली शेवटची निवडणूक झाली असे वाटते. तुला नाही वाटत की, मुंबई हळूहळू आपल्या ताब्यातून सुटत चालली आहे?
राजसेन : त्याचं असं आहे दादू. कुठलीही गोष्ट आपल्या ताब्यातून एकदम जात नाही. ती हळूहळू निसटत जाते.
उधोसेन : आणि मग ती गोष्ट आपल्या हातून कधी निसटून पडली समजतच नाही. शेवटी हातात राहतो तांब्या!
राजसेन : तोही नीट धर, नाही तर इकडे तिकडे शोधावे लागेल.
उधोसेन : काय?
राजसेन : पाण्याची बोटल. बाकी आता आपण दोघांनी आत्मचिंतन केले पाहिजे.
उधोसेन : मला वाटतंय, त्याआधी आत्मग्लानी करावी लागेल. विरोधकांना आपण नको नको ते बोललो राव!
राजसेन : तर काय! आपल्या पप्पूने तर कमालच केली. चक्क नक्कल केली सीएमची! गळ्याच्या शिरा किती ताणल्या होत्या त्याच्या.
उधोसेन : आणि आमच्या संजयसिंहाने शिवाजी पार्कातल्या त्यांच्या रिकाम्या खुर्च्यांचा फोटो कसा मिळविला असेल? आणि तूसुद्धा त्या अडाणींचा काय तो व्हिडीओ काढला होतास.
राजसेन : मला वाटतंय दादू, सगळं कर्माचे फळ आहे.
उधोसेन : मग आता रे काय करायचे?
राजसेन : बहुतेक आपल्याला हे दुकान बंद करावे लागणार, असे दिसते.
उधोसेन : बरोबर आहे. बापजाद्यांच्या पुण्याईवर किती दिवस काढायचे?
राजसेन : नाही तरी अॅक्टिंग आपल्या नसानसात आहे. मिमिक्रीपण जमते आपल्याला. आपण सिनेमा कंपनी काढली तर?
उधोसेन : बरोबर आहे. आपण फिल्म इंडस्ट्रीतच उडी घेऊया!
संजयसिंह : होय ना. विहिरीत उडी घेण्यापेक्षा हे केव्हाही चांगले!