

इंटरव्ह्यूवर : राहुलजी लग्नाविषयी काय मत आहे? कधी करत आहात लग्न?
राहुलजी : लवकरच! आम्ही अचानक ठरवतो.
इंटरव्ह्यूवर : आदित्य साहेबही असंच बोलले. वेगळं उत्तर अपेक्षित होतं. महायुतीचं धोरण दिसतंय.
राहुलजी : आम्ही युतीचं का सांगावं पत्रकारांना?
इंटरव्ह्यूवर : बरं असूदे. आपल्या टी शर्टवर सगळे लोक बोलत आहेत. असा पोशाख करण्याचे कारण समजेल का?
राहुलजी : आमची मर्जी. लोकांचे प्रेम, साधी राहणी आणि उच्च विचार.
इंटरव्ह्यूवर : हे बघा राजकारण साधे नसते. हे सर्व जाणतात. आपल्याला का नाही समजत?
राहुलजी : आम्ही राजकारणात पोहलोय. आता जरा जनतेशी संवाद साधायला काठावर पण बसायचे नाही का? जे पोहले नाहीत त्यांना पोहू देत. एवढेच धोरण आमचे.
इंटरव्ह्यूवर : नुसते पोहून चालत नाही. हे देशात केंदळ साचले आजुबाजूला भ—ष्टाचाराचं ते बाजूला करायला कोण येणार?
राहुलजी : सत्ताधारी काय करत आहेत?
इंटरव्ह्यूवर : अहो ते विचारत आहेत हे? आपण निदान लग्न कराल यंदा ही अपेक्षा आहे.
राहुलजी : मी उत्तरे द्यायला बांधील नाही. आम्हाला इतक्यात नागालँडला जायचे आहे.
इंटरव्ह्यूवर : कशासाठी? तेथील जनतेच्या समस्या आम्ही सोडवू शकेन.
राहुलजी : कशावरून?
राहुलजी : ते आमचं आदरातिथ्य करतात. आम्ही त्यांचे करू. यालाच नीती आणि राजनीती म्हणतात.
इंटरव्ह्यूवर : याला देवाणघेवाण म्हणतात. व्यवहार आहे सर हा. तिकडचीच मुलगी आवडली की काय एखादी?
राहुलजी : ते आमच्या मॉमला विचारा.
इंटरव्ह्यूवर : अहो तुम्ही इंटरव्ह्यू देताय. प्रश्न साधा आहे, आपल्याला झेपेल एवढा. लग्नासंबंधी जाणून घेण्यासाठी मीडिया उत्सुक आहे. मॉम काय सांगणार यात आपल्या.
राहुलजी : आदित्य आणि सलमानला हा प्रश्न विचारा जाऊन. माझेही उत्तर ते देतील.
इंटरव्ह्यूवर : घ्या आता उत्तरेही ते देणार. तुम्ही काय करणार? हा देशाला प्रश्न पडला आहे. उत्तर अपेक्षित आहे तेवढे द्या.
राहुलजी : इधर से आलू डालो उधरसे सोना निकलेगा इतके सोपं आहे का ते?
इंटरव्ह्यूवर : नसता विचारला प्रश्न तर बरं झालं असतं. हेच उत्तर आपल्याकडून अपेक्षित होतं. धन्यवाद सहकार्य केल्याबद्दल.