पहिला चहा : आलिया भोगासी...

phila chaha : Alia Bhogasi
पहिला चहा : आलिया भोगासी...
Published on
Updated on

दादू : महादू, ह्या गॅसच्या समस्या कशा सुटायच्या! सरकारने आत्मनिर्भर व्हा, विदेशीपेक्षा स्वदेशी मालाची जास्तीत जास्त खरेदी करा, असे वारंवार सांगून काय फायदा झाला. आता बसा.

महादू : आता गॅस स्वदेशी वापरायचा तर बायोमास इंधनावरच्या शेगड्या बाजारात येत आहेत. चुलीला पर्याय हो. लाकडाऐवजी तयार काड्या इंधन म्हणून वापरायच्या म्हणे. धूर पण होत नाही. ही चूल फ्लॅटमध्ये चालते. पीएनजीचा वापर करा हे सरकार सांगत आहे. पण ज्या सोसायटीमध्ये पीएनजीची सुविधा नाही, त्यांनी आधी ती सोसायटीपुरती मर्यादित करून घेण्यासाठी अर्ज केले पाहिजेत. वेळखाऊ काम. काय म्हणताव?

दादू : आमचं बरं आहे. आधीपासून पीएनजी वापरतो आम्ही सोसायटीवाले. ही गॅसची जोडणी प्रत्येक सोसायटीने केली पाहिजे आता.

महादू : तुमचं ठीक आहे सगळं. पण या नवीन सोयी आणि त्यांची सवय लावून घेणं जिकिरीचं काम आहे बुवा. ते परवडणारं आहे का? कसं?

दादू : अहो परवडणारं काय म्हणता, गैरसोय तर टळते. इतके महागडे नाही. या गॅसच्या प्रश्नांमुळे सरकारसकट सगळी जनता गॅसवर आहे. स्वयंपाकघरात मात्र याची टंचाई. हा हा हा...

महादू : नको तिथे कसले जॉक हंताव. गप बसा. ते जाऊदे. मला सांगा, त्या तात्याला माघार घ्यायला का जमत नाही. वाया गेलेलं पात्र अमेरिकन पात्र. होर्मुझच्या पात्रात अडकून बसलेला बगळा. टोचा मारता येईना कोणत्याच प्रश्नावर. गॅसच्या फुग्यात घालून सोडला पाहिजे ह्याला. काय समजलिव. द्या टाळी. (हात पुढे करत) खी खी...

दादू : (हात पाठीमागे टांगून) मी का देऊ टाळी? टाळ्या वाजवल्या की लोक म्हणतील तिकडे इतका तणाव चालू आहे गॅस आणि पेट्रोलचा, त्यामागे आपलाच हात आहे की काय? तात्याला आपणच पाठवला की काय युद्ध कर म्हणून.

महादू : मायला तुम्ही भलतीकडेच विषयाला घेऊन घुसता राव. आपण काय ट्रम्प्याला ओळखतो? कधी बोललो का त्याच्याशी? काय पण फेकता...

दादू : तुम्ही फेका काय पण. आम्ही ते ऐकायचं. आम्ही तुमच्या विनोदाला का टाळी द्यायची. तुमच्या विनोदाला गॅसशिवाय पेटायची सवय लागलीय. कुठेपण पेटतंय बिन आगीचं.

महादू : बरं. मग पीएनजी पण नको आणि एलपीजी पण नको. उपलब्ध होईपर्यंत पीजेवर दिवस घालवू. जरा या सगळ्याची झळ कमी बसेल. काय म्हणताव?

दादू : खरे बोललात. आपण सध्या तात्या आणि खरात यांच्या पीजेवर नुसती प्रतिक्रिया देत बसू. करणार काय. समस्या आणि समाधान कारस्थानांच्या बुडाशी आणि शेंड्याशीच असतात. त्यांचे त्यांच्याशी. आलिया भोगासी, असावे सादर...!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news