पहिला चहा : मोहीम फत्ते?

पहिला चहा : मोहीम फत्ते?
पहिला चहा : मोहीम फत्ते?
Published on
Updated on

हेग्या भाऊ (पिट हेगसेठ): महामहीम ट्रम्प जी, पायलट सुखरूप पोहोचतोय वॉशिंग्टनात. चिंता नसावी.

ट्रम्प तात्या : गुड!

हेग्या भाऊ : गुड फ्रायडेला सुटका झाली. गुहेत लपला होता रात्रभर. सकाळी त्याला सुखरूप बाहेर काढलं.

ट्रम्प तात्या : ते कसं...

हेग्या भाऊ : अहो तात्या, सॉरी महामहीम, शुक्रवारी इराणी लोकांनी विमानावर हल्लाबोल केला आणि विमान पाडलं.

ट्रम्प तात्या : शाब्बास. फुशारक्यांबद्दल.

हेग्या भाऊ : इराणी फार आक्रमक झालेत. तो काही करू शकला नाही त्यावेळी. गॉड सेवड हिज लाईफ. थॅन्क्स टू अलमायटी.

ट्रम्प तात्या : (उपहासाने) केक घेऊन या. सेलिब—ेशन करा. आता काय स्टेटस आहे?

हेग्या भाऊ : देव महान आहे. पायलटसहित सर्व सैनिक सुखरूप आहेत.

ट्रम्प तात्या : आरती करा. दिवे ओवाळून घ्या. (तात्या सिगारचा धूर सोडत उपहासाने)

हेग्या भाऊ : ते भारतीय संस्कृतीत आहे.

ट्रम्प तात्या : पण मला आवडेल ओवाळून घ्यायला. मस्त वाटेल.

हेग्या भाऊ : इंडियातून मागवूया का ती ओवाळेची प्लेट?

ट्रम्प तात्या : ओवाळेची प्लेट कशाला? आपल्या काचेच्या प्लेटमदी मेणबत्त्या लावा दोन. तसं ओवाळून टाका. हौशी आहेस तू पिट.

हेग्या भाऊ : थँक्स महामहीम; पण फक्त ओवळायचं असतं महामहीम आणि ठेेवून द्यायचं बाजूला.

ट्रम्प तात्या : ते शिकलो मी इंडियात. पुढे?

हेग्या भाऊ : (स्वगत) इंडियावरून ओवाळून टाका यांना म्हणजे युद्ध थांबेल.

ट्रम्प तात्या : काय बोलला समजले नाही.

हेग्या भाऊ : पायलटचे स्वागत करूया. त्यांचा पुनर्जन्मच झाला आहे असं म्हणतोय...

ट्रम्प तात्या : ते काही नाही. सगळं बाजूला ठेवा. आल्या आल्या त्यांना काम द्या. इराण नकाशावरून गायब झाला पाहिजे.

हेग्या भाऊ : पायलट आणि सैनिक गुड फ्रायडे ते इस्टर या तीन होलीडेजमध्ये सुरक्षित राहिले, हा अमेरिकेसाठी शुभसंकेत आहे.

ट्रम्प तात्या : याचा आनंदोत्सव झाला पाहिजे; पण इराणला संपवूनच.

हेग्या भाऊ : येस महामहीम. (असला येडा मोहीम फत्ते काय करणार?)

ट्रम्प तात्या : गेट लॉस्ट. तोंड वाकडं करून काय बोलतो आहे. मोहीम फत्ते करा. जा तयारीला लागा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news