

यूट्यूबर : काय रे, आज कोणती बातमी रडारवर आहे? सर्वात मुख्य बातमी रे?
रिपोर्टर : तू कोणता कंटेंट क्रिएट करत आहेस, ते सांग आधी.
यूट्यूबर : अरे! तू तर विरुद्ध पक्षासारखा चालूच झालास एकदम. जस्ट विचारलं.
रिपोर्टर : आम्ही कोणाच्याच बाजूचं नाही बोलत. जे घडतं त्यावर बिघडतो. स्वतःचं डोकं चालवून नाही चालत.
यूट्यूबर : अच्छा? अर्णव आणि निखिल?
रिपोर्टर : हे बघ. तुझा कंटेंट तू क्रिएट कर. तू यात नको पडू? मला आज काय बातम्या द्यायचेत ते मी बघून घेतो. दोस्ती दोस्तीच्या ठिकाणी. बाय द वे. तू जा.
यूट्यूबर : तुम्ही रिपोर्टर लोक भलतेच हुशार. आज माझ्याकडे एक कंटेंट आहे महत्त्वाचा. मी तो करतोय. तुला जस्ट विचारलं मी.
रिपोर्टर : कोणता रे? सांगण्यासारखा असेल तर सांग. तुझ्या नावासकट बातमी करूया!
यूट्यूबर : हो का? खरंच ना?
रिपोर्टर : हो. सांग.
यूट्यूबर : कॅटरिना खूप जाडी झालीय ना? त्यावर सटायर मारलंय. छान केलाय कंटेंट. नंतर व्हायरल झाला की बघ!
रिपोर्टर : ये... येडबंबू! यातून काय महत्त्वाची माहिती देणार तू लोकांना?
यूट्यूबर : व्यायाम करा. रामदेवबाबाचे व्हिडीओ जोडले सोबत.
रिपोर्टर : तिकडे नीला विखे पाटील स्वीडनमध्ये खासदार झाल्या त्याचं काही नाही पडलं तुम्हाला, कॅटरिना काय खाते, कुठे जाते, हे हवं तुम्हाला.
यूट्यूबर : येस... मिळाला कंटेंट. थँक्यू फॉर इन्फॉर्मेशन. जातो आता. नीला यांच्यावर व्हिडीओ करतो. खूप व्ह्यूज येतील.
रिपोर्टर : नाव पूर्ण पाठ करा. निव्वळ कॉपी करून पैसे मिळवा लेकांनो. तथ्य राहिलं बाजूला.
यूट्यूबर : दादा आम्ही करमणूक ही करतो. राग नका मानू.
रिपोर्टर : मग, बातमी देणारा कॉमेडियन म्हणून हलक्यात घेता का? ही सामाजिक जबाबदारी आहे. नॉट फॉर एन्टरटेन्मेंट. डू नॉट कॉपी आवर कंटेंट. ओके?
यूट्यूबर : (मनातल्या मनात) आता या वादाचाच कंटेंट बनवतो आणि अपलोड करतो. एक रिपोर्टरने यूट्यूबरची खिल्ली उडवली म्हणून. बसा मग..! (निघून जातो)
रिपोर्टर : (स्वगत) प्रियांका आणि राहुलची इमेज व्हाइसव्हरसा करून टाकलीत लेकांनो. सगळं जग उलटपुलट करून टाकतात तुमचे कंटेंट. नाव विरोधी पक्षाचे पुढं होतंय, त्याचं काय?