पहिला चहा : अंधारातली दिवटी...

अंधारातली दिवटी...
पहिला चहा : अंधारातली दिवटी...
Published on
Updated on

एक दिवटी असते, जिचा छोटासा प्रकाशपण मशाल होऊन वाटसरूंना प्रकाश दाखवते. काही दिवसांपूर्वी तिला स्वप्न पडले. फक्त अंधार, अंधार आणि अंधार दिसत होता. स्वप्न अंधारातच पडतात म्हणा. तिचा स्वतःचा प्रकाश काळाकभिन्न होता. काजळी धरल्याप्रमाणे कांती. काय करावं तिला सुचेना. ज्याला त्याला हिणवत सुटली.

दिवटी : ए... काय रे दिवट्या, मला नको शिकवू, अंधारात मी वाट दाखवते. तुम्ही जेवढा उजेड पाडता तेवढ्याने डोळेच फक्त दीपतात. बाकी उपयोग काय? इथे अंधारात आमची सत्ता चालू होते. काय समजलं?

दिवट्या : तुम्ही आम्हाला दिवट्या म्हणालात? अहो, सामान्यांची ही शिवी आहे. आम्ही आहोत दिवटे; पण असं म्हणणं पाप आहे. ते फेडता येणार नाही तप केले तरी!

दिवटी : तप करायला मी कोणताच देव मानत नाही. सगळे मनघडन आहे. देव कोणी पहिला? जन्म झाला का त्यांचा? मग? जे माता-पिता आहेत देवदेवतांचे त्यांनी प्रामाणिकपणे सांगावे.

दिवट्या : कशाला मिरवतेस गं दिवटे, देवासमोर किती मान तुला? आणि तू असं बोलते?

दिवटी : जिथे अंधार तिथे मी. देवांच्या दारी अंधार असतो, असं म्हणतात. म्हणून मी असते.

दिवट्या : देर असते, अंधेरा नाही. सगळं उलटं बोलते.

दिवटी : ए तीनपाट. हो बाजूला. मी नाही घाबरत.

दिवट्या : मी इनामदार भुसनळे. घाबर घाबर... डोळे बघ..!

दिवटी : दिसतोस खरा तू तसा; पण मी गंगुबाई नाही घाबरायला. खूप दिवे लावलेत तुम्ही आणि तुमच्या पोराने, झीरो बल्बने. ते निस्तरा. जा.

दिवट्या : नाही तुला देवासमोर उजेडात आणलं, तर नावाचा दिवट्या नाही. तुला मी प्रमुख आसनावर बसवेन. मग, तर दिवे लावशील ना?

दिवटी : खरंच की काय? कोणत्या देवासमोर उभी राहू? आताच सांगा. मी रामाची, गणपती बाप्पांची माफी मागून आताच उजेड करते.

दिवट्या : आता शोभतेस अंधारातली दिवटी. नाही तर नुसताच अंधार तुझ्याभोवती. सगळ्या देवांची माफी माग. मी आणि माझ्या पोराने केलेल्या चुकांची माफी ही देवांपर्यंत पोहोचव. आम्ही तुला प्रमुखपदी ठेवतो.

दिवटी : वाह वाह... घालीन लोटांगण, वंदीन चरण. बाप्पा मोरया. माफी द्यावी. मी जे उलटसुलट अद्वातद्वा बोलले ते विसरा देवा. मी नेहमी आपल्या चरणाशी तेवत राहीन. मी नवरात्रीतही नऊ दिवस अखंड तेवत राहीन, मला पदरात घ्या! (त्यानंतर तथाकथित दिवटी देवधर्मात बुडाली आणि आपणच अंधार केला होता, हे विसरून तेवत राहण्याचे व्रत हाती घेतले.)

दिवट्या : तथास्तु!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news