पहिला चहा | हॅले... मी पत्रकार बोलते....!

पहिला चहा | हॅले... मी पत्रकार बोलते....!
Published on
Updated on

जगाच्या नकाशावर नॉर्वे हे भारतापेक्षा पुष्कळ कमी भौगोलिक क्षेत्र असलेलं, पण संपन्न, समृद्ध राष्ट्र. पण नॉर्वेच्या मोकाट (फ्री प्रेस) सुटलेल्या पत्रकारांना सवाल-जबाबाची दांडगी हौस. ती भारतात महाराष्ट्रामध्ये तमाशाच्या फडात कशी रंगते हे नॉर्वेकरना पाहुणचाराला बोलावून पीएमनी एकदा दाखवावे. आपणास एक से एक उत्तरे भेटतील नॉर्वेकर! जगात अव्वल पत्रकार मात्र नॉर्वेजियनांचेच. अवघ्या काही दिवसांपूर्वीच एका हॅले या नॉर्वेजियन पत्रकार बाईने पीएमना प्रश्न करून वायरल करून घेतले.

इन्स्टाग्राम, फेसबुक, ट्विटर ही तिची बंद पडलेली कवाडं नेटकऱ्यांना पटापट खुली झाली. आपले राहुल साहेब पहिले या अकाऊंटवर ट्विट करायला पोहोचले. मोदीजी नॉर्वेच्या प्रेस मीटमध्ये या बाईना उत्तर देण्यास बांधिल नव्हते आणि हॅले बाईने प्रश्नाचे बाण सोडण्यास चालू केले. मुळात ही पत्रकार मुक्त म्हणजे फ्री माईंडेड असल्याने हिला प्रेस कॉन्फरन्स आणि प्रेस मीट यातला फरक जाणून घ्यायचा नव्हता. आलेल्या पाहुण्याचा पाहुणचार रॅगिंगने करून भारतीय पत्रकारांना नवीन धडे हॅलेने गिरवायला दिले.‌

‘मोदी आपण स्वतंत्र पत्रकार असणाऱ्या नॉर्वे प्रेसला का उत्तर देत नाही‌’, हा हॅले लिंगचा प्रश्न! मोदी पीछे मूड करायच्या मूडमध्ये नव्हते. ते नॉर्वेच्या पीएमना भेटले आणि निघताना या हॅले बाईंनी हाक दिली. हॅलेबाईंना एवढे समजले नसावे का, की मोदींनी पुढे जाऊन पुन्हा पाठीमागच्या कुरघोड्यांना (घोडीला) का लगाम द्यावा? म्हणून ते न जुमानता निघून गेले असावे. भारताच्या वतीने प्रेस कॉन्फरन्स बोलावली तेव्हा या हॅलेबाई पाणी पिण्याच्या निमित्ताने उत्तर न देता मध्येच निघून गेल्या. याला फ्री प्रेस म्हणत असावेत नॉर्वेकर. कधीही कुठेही उठून जावे. जॉर्ज भाऊंकडून भारतीय संस्कृतीचे पाढे वाचले गेले आणि या बाईंच्या घशाला कोरड पडली.

पुढे बोलता येईना स्वतःच्याच प्रश्नावर. याच बाईंचा प्रश्न होता नॉर्वेने भारतावर विश्वास का ठेवावा? याची उत्तरे जॉर्जभाऊंनी दिल्यावर या प्रश्नाला कडेवर घेऊन पाणी पाजायला घेऊन गेल्या, त्या परत आल्याच नाहीत. आता प्रश्न निर्माण होतो नॉर्वेवर विश्वास ठेवून पुढचे दौरे पण करावे का? याला उत्तर म्हणून इटलीचा दौरा सार्थ करत मेलोनी यांना मेलोडी गिफ्ट दिली. थोडक्यात, भारतावर विश्वास ठेवावा का, याचे उत्तर मेलोडी आणि मेलोनी यांनी दिले. पीएम अपमानित होऊन परतत असतील तर पश्चिमात्य देशांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची वाट पाहावी लागेल. राहुल साहेबांनी आपला पाठिंबा हॅलेला दिल्याने भारत हलेल असे होत नाही. (एक मोकाट पत्रकार)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news