पहिला चहा | अवघ्या विश्वाची पक्षपंढरी

पहिला चहा | अवघ्या विश्वाची पक्षपंढरी
पहिला चहा | अवघ्या विश्वाची पक्षपंढरी
Published on
Updated on

सभागृहातून फरार झालेल्या एका कर्तव्यशून्य पक्षाचे (आता झाडावर बसून) मनोगत. (बोलका पोपट म्हटलात तरी चालेल) इटलीतून मेलोनी आल्या मेलडी खायला, विरोधकांनी पोळ्या घेतल्या भाजायला, इटली-भारत करार, ट्रम्प बापू फरार, अफवांवर विश्वास नको सांगितले ना एकदा, देवभाऊंची जनतेवर मदार..! पॅनिक बाईंग सोडा राव इंधन टंचाई नाहीच मुळी, पेट्रोल डिझेलची नाही कमतरता अफवांना जाऊ नका बळी! देवभाऊंचा दावा, पवारांनीही केला पाठपुरावा, टीकेचे शस्त्र आवरा, कळावे लोभ असावा.

मोदींचा परदेशी दौरा, धोरणात्मक खरा. या देशातून त्या देशात पण जनतेस मिळावा सुखाचा निवारा, असा पवारांचा जनतेस इशारा! उन्हाच्या तडाख्यात राबतो शेतकर्‍याचा घोळका, पण लखनौला पडला लॉकडाऊनचा विळखा, चांदा ते बांदा एवढा उन्हाळा, दिवसाची रात्र करून शेतकरी घायाळला. इकडे नीटचा प्रश्न अजूनही सुटेना, परीक्षा द्यावी की मांडवली करावी विद्यार्थ्यांनाही कळेना, पेपरफुटीच्या दुखण्यात मास्तुरे बुडाला, औषध विक्रेत्यांच्या संपात औषधालाही मुकला, तेवढ्यात इस्पितळात कोणीतरी बॉम्ब ठेवून पळाला, आहे की नाही पुरता घोटाळा.

जागतिक इंधन टंचाईने आ वासला, सगळा भार इथेनॉलने झेलला. डिजिटलायजेशनला आता रॅपिडोची साथ, महाआयडी, महासारथी आणि आपले सरकार देतील मदतीचा हात. निधी जमवून सीएसआरची; करूया जनकल्याण, देवाभाऊंचे खरेच उद्गार महान. नवीन तंत्रज्ञान नव्या वाटा पडताळून पाहूया, मंत्र्यांच्या धोरणाचे पवारांप्रमाणे पाठीराखे होऊया. नकोत इथे या ठिकाणी त्या ठिकाणी कुठल्याच ठिकाणी दूजाभाव, परिस्थितीचा घेऊनी ठाव तोडून टाका भेदभाव. हा पक्ष तो पक्ष फांद्या बदलून पक्षीही कंटाळले आता, मातोश्रीवरच्या निवांत पक्षालाही कंटाळली युती काय म्हणता?

राष्ट्रवादी विलीनीकरणाची चर्चा नको, आता पवार पुटपुटत बोलले, पक्षी बैठकीत राहतात गैरहजर आमचे काय नडले? पोपट, कावळे भलते पक्षी यांची बैठक कशाला? बडबड बादशाह दंग! पुरावे करतोय गोळा, इकडे वहिनींनी घरचे आटोपून सावरला पक्षाचा घोटाळा.

बाळा बाळा सावर आता, नको करू बडबड नसती. अवघ्या विश्वाची (पक्षाचीही) पंढरी झाली आता..!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news