New Year restart: रिस्टार्ट दाबा...

नवं वर्ष म्हणजे कॅलेंडरचं पान उलटणं एवढंच नाही; ती आपल्या मनाची, सवयींची आणि थोड्याफार प्रमाणात नशिबाचीही ‌‘रिस्टार्ट‌’ बटण दाबण्याची संधी मानायला काय हरकत आहे
New Year restart
New Year restartPudhari
Published on
Updated on

उठा उठा... नवं वर्ष सुरू झालं... झोपा सोडा, कामाला लागा. नसलंच हाती काही, तर निवडणुकीच्या कामाला लागा!

हे लक्षात घ्या... नवं वर्ष म्हणजे कॅलेंडरचं पान उलटणं एवढंच नाही; ती आपल्या मनाची, सवयींची आणि थोड्याफार प्रमाणात नशिबाचीही ‌‘रिस्टार्ट‌’ बटण दाबण्याची संधी मानायला काय हरकत आहे? 31 डिसेंबरच्या रात्री जेवढ्या जोमात ‌‘इयर एंड‌’ अन्‌‍ ‌‘न्यू इयर‌’ साजरं केलं; पण अलार्म बंद करून पुन्हा पांघरूण ओढून कोणी ताणून दिली? तरीसुद्धा नवं वर्ष म्हटलं की, मनात एक गोडशी खळबळ उडालीच ना!

पहिल्याच दिवशी संकल्पांची रेलचेल असेल ना मनात? यावर्षी फिटनेस, बचत, वेळेवर झोप आणि हो, यावर्षी कमी राग! जणू काही 1 जानेवारीला बह्मदेव स्वतः खाली उतरून आपल्या सगळ्या सवयी अपडेट करून देणार आहेत! काही संकल्प आठवडाभर टिकतात, काही महिनाभर, तर काही फक्त व्हॉटस्‌‍ॲप स्टेटसपुरतेच तर राहणार नाहीत ना? पण, संकल्प मोडले म्हणून वर्ष वाया गेलं असं नाही. उलट प्रयत्न करण्याची ऊर्मी जिवंत आहे, हेच मोठं यश.

नव्या वर्षानं आशेचं पान उघडलंय. मागील वर्षी जे राहून गेलं, जे बिनसलं, जे जडलं नाही, त्यावर हलकीशी रेघ मारून पुढे जायचं धैर्य त्यानं दिलंय. कधी नोकरीबाबत, कधी व्यवसायात, कधी नात्यांमध्ये. अपयशाच्या धक्क्यावर आशेचं मलम लावण्याचं काम नववर्षांनं केलंय...

काय करायचं, काय घ्यायचं, काय वेचायचं?....आजच ठरवायचं! नव्या वर्षाची ऊर्मी म्हणजे नव्या सुरुवातीची ऊर्जा. नवे संकल्प, वहीच्या पहिल्या पानावर नीट अक्षरात 1 जानेवारी 2026 लिहिण्याचा आनंद अन्‌‍ मनात कुठेतरी दडलेली स्वप्नं पुन्हा डोळस होताना मिळणारा आनंद, हीच खरी श्रीमंती.

आयुष्य परफेक्ट होईलच असं नाही; पण यंदा थोडं अधिक समजूतदार, थोडं अधिक धाडसी आणि थोडं अधिक हसतं राहायचं ठरवलं, तरी पुरेसं आहे. म्हणून नवं वर्ष आलं की, फटाके जितके बाहेर फुटले त्याहून जास्त आशेचे फटाके आपल्या मनात फुटू देऊयात. कारण, शेवटी वर्ष नवं असो वा जुनं, आपण मात्र रोज नवे होऊ शकतो. नाही का? रिस्टार्ट मारण्याशिवाय पर्याय आहे तरी कुठे?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news