India Afghanistan friendship | भारत-अफगाणिस्तान मैत्रीचे नवे पर्व

India Afghanistan friendship
India Afghanistan friendship | भारत-अफगाणिस्तान मैत्रीचे नवे पर्वFile Photo
Published on
Updated on

सचिन बनछोडे

अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री मावलवी आमीर खान मुत्ताकी हे आपल्या सहा दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी गुरुवारी नवी दिल्लीत दाखल झाले आणि पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून उभय देशांमधील मैत्रीचा नवा अध्याय सुरू झाला. तालिबानने अफगाणिस्तानची सत्ता हाती घेतल्यानंतर कोणत्याही अफगाण परराष्ट्रमंत्र्याने भारताला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. अफगाण परराष्ट्र मंत्र्यांचा हा भारत दौरा अनेक दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जात आहे. कारण, ही भेट भारत आणि तालिबान शासन यांच्यातील संबंधांमध्ये एक नवा अध्याय जोडू शकते.

भारताने अद्याप तालिबान सरकारला अधिकृत मान्यता दिलेली नाही आणि अफगाणिस्तानमध्ये समावेशक सरकार स्थापन करण्याचे वारंवार आवाहन केले आहे; मात्र आता भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आणि मुत्ताकी यांच्या भेटीवेळी जयशंकर यांनी सांगितले की, भारत काबूलमध्ये आपले दूतावास पुन्हा सुरू करणार आहे.भारताने अनेक वर्षांपासून अफगाणिस्तानमध्ये रस्ते, शाळा, रुग्णालये आणि संसद भवन यांसारखी विकासकामे केली आहेत. 2021 मध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबान सत्तेवर आल्यानंतर भारताने सुरुवातीला त्यांच्यापासून अंतर ठेवले; परंतु काही काळानंतर संवादाची प्रक्रिया सुरू झाली. जून 2022 मध्ये भारताने काबुलमध्ये एक तांत्रिक मिशन उघडले.

चालू वर्षी जानेवारीमध्ये परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी दुबईत मुत्ताकी यांची भेट घेतली. त्यानंतर मे महिन्यात पहलगाम हल्ल्यानंतर जयशंकर यांनी मुत्ताकी यांच्याशी फोनवर चर्चा केली होती. जयशंकर यांनी मुत्ताकी आणि त्यांच्या प्रतिनिधी मंडळाचे उत्साहपूर्वक स्वागत केले. ही भेट भारत आणि अफगाणिस्तानमधील मैत्री आणि संबंध पुढे नेण्याची एक महत्त्वाची संधी असल्याचे त्यांनी सांगितले. भारताने आपली जुनी आणि दीर्घकाळची भागीदारी पुन्हा व्यक्त केली. दोन्ही देशांनी पूर्ण झालेल्या प्रकल्पांची देखभाल, अपूर्ण राहिलेले प्रकल्प पूर्ण करणे आणि नवीन प्राधान्यांवर एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली.

भूकंपानंतर भारताने अफगाणिस्तानला मदत सामग््राी पाठवली होती. आता भारताने घरे पुन्हा बांधण्यासाठी मदत करण्याची तसेच औषधे व अन्य वैद्यकीय मदत पुरवण्याची इच्छा दर्शविली आहे. याव्यतिरिक्त भारत अफगाणिस्तानच्या नागरिकांना सातत्याने खाद्य सामग््राीचा पुरवठा करत आहे. अफगानिस्तानाने खाणकाम व्यवसायात भारतीय कंपन्यांना गुंतवणुकीसाठी निमंत्रित केले आहे. भारत हा मित्र देश आहे. आमच्या भूमीचा भारतविरोधी कारवायांसाठी वापर होऊ देणार नाही, असेही अफगाणिस्तानने म्हटले आहे. दोन्ही देशांदरम्यान अतिरिक्त विमानांचेही उड्डाण सुरू झाले आहे. सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तान संबंधांमधील तणाव विकोपाला गेलेला आहे. अशा स्थितीत मुत्ताकी यांचा हा भारत दौरा महत्त्वाचा ठरलेला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news