Tanker Overturn Traffic Jam | शरणचिठ्ठी

Tanker Overturn Traffic Jam |
Tanker Overturn Traffic Jam | शरणचिठ्ठी
Published on
Updated on

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर टँकर उलटल्याने 31 तास वाहतूक ठप्प झाली. त्या गदारोळात ससा आणि कासवाची भेट झाली. पुढे काय झाले? ऐका तर...

ससा : अरे भाऊ कासवा, तूही आलास. मला गाठलेस तू? तुला हे कसं काय शक्य झाले?

कासव : आलो हळूहळू कसा तरी! अरे दादा, पण तू अजून इथेच कसा?

ससा : काय सांगू कासवा. ट्रॅफिक जॅम. टुणटुण उड्या मारत पुढे सरकत आलो कसाबसा!

कासव : मग तू थोडी विश्रांती घेतली असशील नेहमीप्रमाणे?

ससा : कसली डोंबलाची विश्रांती घेतोय? सगळ्या वाहनांचा धूर माझ्या नाका-डोळ्यांत जातोय. मला पुढचे दिसायची पंचाईत.

कासव : होय. तुझा रंगपण बदललाय. घरी गेल्यावर दहा रुपयांची डिटर्जंट पावडर बादलीत घाल आणि त्यात दहा मिनिटे उडी मारून दडी मार.

ससा : म्हणजे काय होईल?

कासव : म्हणजे तुझ्या अंगावरचे सगळे डाग निघून जातील. बाय द वे, या तीस तासांत काही खायला मिळाले का तुला?

ससा : लेका काय खाणार? आजुबाजूचे गवत सगळे करपून गेले आहे.

कासव : मग काय खाल्लंस?

ससा : लहान-लहान मुलांनी टाकून दिलेले बिस्किटाचे तुकडे, फरसाण आणि केळीच्या साली. मर्दा, जॅम अ‍ॅसिडिटी वाढलीय. पाण्याचा एक थेंब मिळाला नाही रे!

कासव : टोल नाक्यावर तरी काही मिळाले की नाही?

ससा : टोल नाकेवाले म्हणाले, लवकर पळ, नाही तर पेकाटात काठी घालीन. मग, ऐंशीच्या स्पीडने पळालो.

कासव : मग, आता काय रे करायचे?

ससा : एक आयडिया आहे. मी तुझ्या पाठीवर बसेन आणि तू मला हळूहळू मुंबईच्या दिशेने घेऊन जा.

कासव : याच्या बदल्यात तु मला काय देशील?

ससा : मी तुला शरणचिठ्ठी देईन. ‘इथून पुढे तुझ्याबरोबर कधीही शर्यत लावणार नाही.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news