

पुणेकर : काय भाई, मस्त वाटत आहे या मिसिंग लिंकमुळे! प्रवास अगदी मस्त होतोय. मी दोनदा आलोय या रूटवर.
मुंबईकर : मला अजून योग नाही आला. देवाभाऊंनी लिंकच्या ब्रीजवर सुळेसदृश केबल बसवले. खरंय का?
पुणेकर : केबल स्टेड ब्रीज का? मोठा जोक केलास...
मुंबईकर : असे ऐकले सो विचारले.
पुणेकर : 1 मे दिवशी मुळे बाई अडकल्या होत्या मिसिंग लिंकच्या टनेलमध्ये. त्यामुळे ब्रीजवर सुळे लागलेत. जर कोणी राडा घातला तर ब्रीजवरचे केबल सुळे होऊन पाठीमागे लागतात असं एकजण निषेधार्थ बोलून गेला.
मुंबईकर : म्हणजे गाड्या धावताना त्या केबल पाठीमागून येताना भासतात का? अच्छा! त्यांचा आकार तसा आहे लांब म्हणून.
पुणेकर : हो. सुळे असल्याचा भास होतो. हा हा. जोक अपार्ट. शार्कच्या जबड्यातून निघतोय असं वाटतं. टनेल 8 किमीचा आहे आणि ब्रीज केबल स्टेड आहे. त्यामुळे महाकाय दर्शन होतं. मुळे बाईंनी हेच दृश्य पाहून टनेलमध्ये गाडी थांबवली असणार...
मुंबईकर : कोणता नवीन जॉक केलास?
पुणेकर : हा जॉक जरा हायलेवल आणि पॉलिटिकल आहे.
मुंबईकर : ओह. मग जाऊदे. तिथे सुळे येतातच.
पुणेकर : मुळे मुळे...
मुंबईकर : मुळे बाईमुळे असं म्हणायचंय का?
पुणेकर : हो. अरे अर्धा तास त्या एकसारखे बोलत टनेल अडवून होत्या. आणि म्हणतात बघा, टनेल करून काय उपयोग. वाहनांची कोंडी अजून ऐरणीवरच. ही पुलावरून हटेना. निम्मे लोक तर या बाईंना बघण्यासाठी म्हणून वाहने लावून उभे होते. कोंडी तर होणारच होती.
मुंबईकर : लोणावळा लेक डोक्यावर आहे म्हणून घाबरल्या असतील...
पुणेकर : असेलही. पण हा अभियांत्रिकीचा यशस्वी प्रयोग आहे. देवाभाऊंचे आभारच मानायला पाहिजेत.
मुंबईकर : हा शोध शिंग्रोबा धनगर याने इंग्रजांच्या काळी लावला. या शिंग्रोबांचे नाव मिसिंग लिंकला का देत नाहीत. याचे मंदिर पण आहे घाटात. मी पाहिलंय.
पुणेकर : थांब, मी नंतर कॉल करतो. ब्रीजवर पोहोचलो. सुळे दिसतात समोर शार्कचे. मुळेचे नाही. हे हे. चल बाय. धन्यवाद मिसिंग लिंक. एन्जॉयिंग जर्नी!