पहिला चहा : मेलोनी व्हर्सेस ट्रम्प..!

meloni vs trump global politics contrast
पहिला चहा : मेलोनी व्हर्सेस ट्रम्प..!
Published on
Updated on

मेलोनी : मला तुमचे समर्थन करता येणार नाही यावेळेस. तुम्ही ठुकरटगिरी थांबवा.

ट्रम्प : मेलोनी, तुला माहिती आहे का तू काय बोलतेस?

मेलोनी : मला सगळ्यात जास्त कळते मी कसं वागायला, बोलायला पाहिजे. समजलं. आम्ही तुम्हाला पाठिंबा देणार नाही. इटली हेटस् यू.

ट्रम्प : ओके. खूप मोठे धाडस केलेस तू अमेरिकेला हेटाळून.

मेलोनी : मला बाकी इस्रायलशीही देणेघेणे नाही की, त्यांना काय वाटते. विनाकारण इंधनवाढ कोणत्याच देशाला परवडणारी नाही.

ट्रम्प : तुम्ही शस्त्र पुरवा. नको ते डोक्यात नका ठेवू.

मेलोनी : तुम्ही होर्मुझला स्वतःच्या स्वार्थासाठी सुरुंग लावा. आम्ही ते पाहू असं वाटते का? आम्ही हेल्प नाही करणार यापुढे.

ट्रम्प : इराणशी आम्ही पंगा घेतोय. सगळ्यांनी पंगा घ्या इराणशी, असं मी म्हणेन.

मेलोनी : इटलीच्या प्रतिष्ठेवर पाणी सोडायला लावताय, असं सांगून. आम्ही इथून पुढे शस्त्रपुरवठा नाही करणार. हे फायनल.

ट्रम्प : फ्रान्स, रशिया सगळे विरुद्ध आहेत. त्यात तुम्ही काड्या घाला.

मेलोनी : आम्ही माचिस नाही, शस्त्र तयार करतो. इटालियन पिस्तूल जगप्रसिद्ध आहे.

ट्रम्प : मग करा. तेवढे करा आणि पुरवा आम्हाला माचिस. होर्मुझ पेटवून देतो.

मेलोनी : आगीत तेल ओतणे, होर्मुझमध्ये सुरुंग पेरणे, आ बैल मुझे मार, किती कौतुक करावं आपलं? राईट डिअर ट्रम्प?

ट्रम्प : मेले जागी हो.

मेलोनी : तू बारीक डोळे करत चिनी लोकांशी पंगा घे, इराणशी घे, तुझ्यापेक्षा मोदी बरे. शांती समझोत्यावर विश्वास ठेवतात.

ट्रम्प : इंडियात मी लोकांना आवडतो, असं माझे परममित्र मोदींनी काल चाळीस मिनिटांच्या कॉलवर चाळीस वेळा सांगितले.

मेलोनी : तुला अलीबाबा चाळीस चोर स्टोरी सांगितली का मोदींनी?

ट्रम्प : नाही. त्याचे काय?

मेलोनी : तू तेलाची जहाजं अडवणारा आणि तेलाच्या खाणी लुटणारा अलीबाबाच्या भावासारखा आहेस. मोदींकडून शिक हावरट.

ट्रम्प : मोदींतर्फे तुला साष्टांग नमस्कार. एरव्ही शेक हँड बरं का?

मेलोनी : ट्रम्पू, तुलाही कोपरापासून नमस्कार. गुड बाय. टेक केअर डियर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news