झोहरान ममदानी

झोहरान क्वामे ममदानी यांनी नुकतीच डेमोक्रॅटिक सोशलिस्ट पक्षाकडून निवडणूक लढवत न्यूयॉर्कच्या महापौरपदाची निवडणूक जिंकली.
Editorial
झोहरान ममदानी(Pudhari Photo)
Published on
Updated on

झोहरान क्वामे ममदानी यांनी नुकतीच डेमोक्रॅटिक सोशलिस्ट पक्षाकडून निवडणूक लढवत न्यूयॉर्कच्या महापौरपदाची निवडणूक जिंकली. जन्माने आफ्रिकन आणि पहिले भारतीय-अमेरिकन मुस्लिम असणारे ते न्यूयॉर्कचे पहिले महापौर ठरले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे 34 वर्षीय झोहरान यांची निवड ट्रम्प यांच्यासाठी मोठा धक्का देणारी मानले जात आहे. झोहरान त्यांची आजपर्यंतची सामाजिक, राजकीय वाटचाल पाहता ही निवड अनेक कारणांनी उल्लेखनीय आहे.

वीरकुमार पाटील

ममदानी यांचा जन्म 1991 मध्ये युगांडाची राजधानी कंपाला येथे झाला. ममदानी यांच्या वडिलांनी एक क्रांतिकारी नेते आणि घानाचे पहिले पंतप्रधान क्वामे एन्क्रुमाह यांचे क्वामे हे मधलं नाव झोहरान यांना दिले. महत्त्वाचे म्हणजे ममदानी हे प्रसिद्ध भारतीय-अमेरिकन चित्रपट दिग्दर्शिका मीरा नायर आणि कोलंबिया विद्यापीठाचे नामांकित प्राध्यापक भारतीय वंशाचे महमूद ममदानी यांचे पुत्र आहेत. झोहरान वयाच्या पाचव्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत गेले. त्यावेळी त्यांचे वडील केपटाऊन विद्यापीठात प्राध्यापक होते. त्यामुळे केपटाऊनमध्येच त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. वयाच्या सातव्या वर्षी ते न्यूयॉर्कमध्ये आले आणि ब्राँक्स हायस्कूल ऑफ सायन्समध्ये त्यांनी पुढील शिक्षण पूर्ण केले. सन 2014 मध्ये त्यांनी बोडन कॉलेजमधून बॅचलर इन आफ्रिकन स्टडीजमध्ये पदवी मिळवली. 2018 मध्ये ममदानी यांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले. सक्रिय राजकारणात प्रवेश करण्याआधी सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम केलेे. क्वीन्स, न्यूयॉर्कमध्ये फोरक्लोजर काऊन्सलर म्हणून ते काम करत होते.

Editorial
India World Cup Victory Reaction | सोलापूरच्या लेकी म्हणतात, हा विजय खासच..!

सामाजिक जाणिवेतून गरीब आणि आर्थिक अडचणीमुळे आपले घर गमावण्याची शक्यता असलेल्या कुटुंबांना ते मदत करत होते. त्यावेळी त्यांना जाणवले की, ते ज्या कुटुंबांना मदत करत आहेत, त्यांच्या समस्या केवळ आर्थिकच नाहीत; तर प्रशासकीय, राजकीय धोरणात्मक पातळीवरच्याही आहेत. ही जाणीवच त्यांना सक्रिय राजकारणात येण्यासाठी प्रेरित करून गेली. यातूनच झोहरान यांनी 2020 मध्ये न्यूयॉर्क असेंब्लीसाठी डेमोक्रॅटिक सोशलिस्ट पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवली. पहिल्याच निवडणुकीत ते विजयी झाले आणि न्यूयॉर्क स्टेट असेंब्लीमधील पहिले दक्षिण आशियाई आणि पहिले सोशलिस्ट प्रतिनिधी ठरले. तीच यशस्वी कारकिर्द त्यांनी पुढे कायम ठेवत, त्यांनी आता न्यूयॉर्कच्या महापौरपदाची निवडणूक जिंकली आहे.

विशेष म्हणजे, विजयी भाषणात त्यांनी भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या ऐतिहासिक ‘ट्रिस्ट विथ डेस्टिनी’ या भाषणाचा उल्लेख केला. तथापि, झोहरान हे त्यांच्या वक्तव्यांमुळे किंवा टीकेमुळे वादग्रस्तही ठरवले गेले आहेत. एका अमेरिकन चॅनलवर पॅनल डिस्कशनमध्ये त्यांनी इस्रायलला ज्यू राष्ट्र म्हणून अस्तित्वाला विरोध करत केला होता. त्यांनी पॅलेस्टाईनला पाठिंबा दिला होता. मध्यपूर्वेतील अस्थिरतेवरून इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यावर सडकून टीका केली होती. न्यूयॉर्क ही अमेरिकेची आणि पर्यायाने जगाची आर्थिक राजधानी आहे. आणि या नगरीच्या महापौरपदी आपला विरोधक निवडून येणे हे ट्रम्प यांना रुचणारे नाही. दोघांत यापुर्वी झालेले वाकयुद्ध जगाला माहिती आहे. त्यामुळे यापुढील काळातही न्यूयॉर्कचे महापौर सतत हेडलाईन्समध्ये राहिले तर आश्चर्य वाटायला नको.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news