Khaby Lame: खाबी लामे

सध्या लामे जगातील सर्वात मोठ्या डिजिटल क्रिएटर्सपैकी एक मानला जातो
Khaby Lame
Khaby LamePudhari
Published on
Updated on
युवराज इंगवले

आधुनिक जगात सोशल मीडिया हे एक प्रभावी साधन बनले आहे. अगदी सामान्य माणसापासून ते उच्चभ्रू व्यक्ती असो, प्रत्येकजण सोशल मीडियाचा वापर अगदी खुबीने करताना दिसत आहे. अशातूनच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तयार झाले. त्यातील एक प्रभावी चेहरा म्हणजे खाबी लामे होय. जगाला कोरोना महामारीचा मोठा झटका बसला होता; पण त्यातून सावरणे अनेकांसाठी कठीण झाले. लाखो नैराश्यात गेले; पण त्यावर मात करत अनेकांनी जगभरात डंका वाजविला. त्यातीलच खाबी लामे हा एक. मेकॅनिकची नोकरी गेल्यानंतर शांततेलाच त्याने स्वतःची ओळख बनवले. कोणत्याही प्रकारचा गोंधळ न घालता त्याने असे व्हिडीओ बनवले, ज्यात आयुष्यातील अनेक समस्या अगदी गंमतीशीर पद्धतीने सोप्या केल्या. त्याचा हाच साधेपणा सर्वांना भावला. सध्या लामे जगातील सर्वात मोठ्या डिजिटल क्रिएटर्सपैकी एक मानला जातो.

सोशल मीडियावर त्याचे सुमारे 36 कोटी फॉलोअर्स आहेत. त्याचा हा प्रवास सहज नव्हता. त्याने कठीण परिस्थितीवर मात करत मोठे यश मिळविले. तोच लामे आता एआयच्या जगात एक नवीन अध्याय लिहिणार आहे. 2020 मध्ये ओव्हर-द-टॉप लाईफ हॅक्सवर न बोलता प्रतिक्रिया देऊन चर्चेत आलेला 25 वर्षीय लामे आता डिजिटल ट्विनच्या माध्यमातून व्हर्च्युअल अवतारात समोर येणार आहे. इटलीमध्ये सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित असलेल्या लामेने हाँगकाँगच्या एआय कंटेंट फर्म रिच स्पार्क होल्डिंग्ससोबत सुमारे 8,961 कोटी रुपयांचा ऐतिहासिक करार केला आहे. यामध्ये त्याने त्याच्या बँडिंग, फेस आयडी, व्हॉईस आयडी आणि बिहेवियरल मॉडेल्सच्या वापरास मान्यता दिली आहे. आता एआयद्वारे त्याचे व्हर्च्युअल ट्विवन तयार होईल, जे थेट आणि अनेक भाषांमध्ये कंटेंट तयार करू शकतील.

सोशल मीडिया क्रिएटर्सच्या जगात हा सर्वात मोठा करार मानला जात आहे. हे डिजिटल व्यक्तिमत्त्व हक्कांच्या भविष्याला दिशा देऊ शकते. हाँगकाँगची फर्म लामेच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि आवाजातील चढ-उतार एआयच्या मदतीने तंतोतंत कॉपी करणार आहे. लामेची व्हर्च्युअल आवृत्ती त्याच्यासारखीच दिसेल, बोलेल आणि वागेलही. या डिजिटल जुळ्याच्या माध्यमातून तो उपस्थित नसतानाही चोवीस तास जगभरातील प्रेक्षकांशी जोडला जाऊ शकेल. या करारामुळे 33 हजार कोटी रुपयांचा नवीन व्यवसाय निर्माण होईल. या करारामुळे क्रिएटर बँडस्‌‍ आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्यातील नातेसंबंधात मोठा बदल घडून येत आहे.

रिच स्पार्क होल्डिंग्सने लामेच्या मुख्य कंपनीचे अधिग््राहण अधिकृतरीत्या पूर्ण केले आहे. या करारामुळे कंपनीला त्यांच्या जागतिक बँडचे व्यावसायिकीकरण आणि विस्तार करण्याचे व्यापक अधिकार मिळाले आहेत. उद्योगतज्ज्ञांच्या मते, हा करार लामे याला क्रिएटर-नेतृत्वाखालील एआयच्या बँडिंगच्या नव्या युगाच्या केंद्रस्थानी आणतो. यामुळे उत्सुकता निर्माण होत असली, तरी ओळख, संमती आणि इन्फ्लुएन्सर संस्कृतीच्या भविष्याबाबत अनेक प्रश्नही उपस्थित होत आहेत. एआयनिर्मित सेलिबिटी प्रतिमा वाढत असल्या, तरी हा करार त्याच्या प्रचंड प्रमाणामुळे आणि चेहरा, आवाज व वर्तन यांसारख्या वैयक्तिक डेटाच्या औपचारिक परवान्यामुळे विशेष ठरतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news