Indian Origin Success | भारतीय वंशियांची भरारी

या पार्श्वभूमीवर, 22 वर्षांचे आदर्श हिरेमठ आणि सूर्य मिधा यांनी केवळ एका स्टार्टअपने केवळ आर्थिकद़ृष्ट्या नव्हे तर तांत्रिक द़ृष्ट्याही एआय क्षेत्रात अभूतपूर्व उंची गाठली आहे.
Indian Origin Success
भारतीय वंशियांची भरारी(Pudhari File Photo)
Published on
Updated on
Summary

भारतीय वंशाचे तरुण यश आणि संपत्तीच्या बाबतीत मोठमोठी उड्डाणे घेताना दिसत आहेत. आदर्श हिरेमठ आणि सूर्य मिधा यांनी एका स्टार्टअपद्वारे आर्थिकद़ृष्ट्या नव्हे, तर तांत्रिक द़ृष्ट्याही एआय क्षेत्रात अभूतपूर्व उंची गाठली आहे.

अपर्णा देवकर

आदर्श हिरेमठ यांच्या पालकांचे मूळ कर्नाटकात असून, ते ‘मर्कर’चे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी आहेत. सूर्य मिधा यांच्या कुटुंबाचे मूळ नवी दिल्लीचे असून, ते कंपनीच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष आहेत. हे तिघे सन होजे (कॅलिफोर्निया) येथील शाळेत शिकताना ‘भविष्यातील कामकाजाची दिशा’ यावर चर्चा करीत. नंतर फूडीने जॉर्जटाऊन विद्यापीठात अर्थशास्त्र, हिरेमठने हार्वर्डमध्ये संगणक विज्ञान आणि मिधाने जॉर्जटाऊनमध्ये परराष्ट्र सेवा विषयाचा अभ्यास केला. 2023 साली या तिघांनी सिलिकॉन व्हॅलीत मर्कर या स्टार्टअपची स्थापना केली. ही कंपनी एआय लॅब्सना तज्ज्ञ व्यक्तींशी जोडते जेणेकरून ते ‘फाऊंडेशनल एआय मॉडेल्स’चे प्रशिक्षण देऊ शकतील. फेब—ुवारी महिन्यात या स्टार्टअपने 100 दशलक्ष डॉलर्सचे भांडवल उभारले होते, ज्यामुळे त्यावेळी तिचे मूल्यांकन 2 अब्ज डॉलर्स झाले होते. फक्त आठ महिन्यांतच कंपनीचे मूल्यांकन तब्बल 10 अब्ज डॉलर्सवर पोहोचले आहे.

या प्लॅटफॉर्मला पेपालचे संस्थापक पीटर थील, ट्विटरचे (आताचे ‘एक्स’) संस्थापक जॅक डोर्सी आणि क्वोरा संस्थापक अ‍ॅडम डी’अँजेलो अशा गुंतवणूकदारांचे पाठबळ लाभले. बेंचमार्क, रॉबिनहूड यांसारख्या प्रमुख व्हेंचर कॅपिटल फर्म्सनीही यामध्ये गुंतवणूक केली. आतापर्यंत मर्करने एकूण 500 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त निधी उभारला आहे. मर्करची सुरुवात एआय-आधारित भरती प्लॅटफॉर्म म्हणून झाली होती; परंतु नंतर त्यांनी कंपन्यांना वैज्ञानिक, डॉक्टर आणि वकील यांसारखे तज्ज्ञ पुरवण्याचे काम सुरू केले. सध्या या प्लॅटफॉर्मवर 30,000 हून अधिक तज्ज्ञ नोंदणीकृत आहेत.

अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीमध्ये अनेक भारतीय वंशाचे एआय उद्योजक झळकत आहेत. पर्पेलेक्सिटी या एआय स्टार्टअपचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद श्रीनिवास हे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश ठरले असून, त्यांची एकूण संपत्ती सुमारे 2 अब्ज डॉलर्स इतकी आहे. अ‍ॅब्रिडेज या एआय-संचालित मेडिकल डॉक्युमेंटेशन प्लॅटफॉर्मचे संस्थापक शिव राव, आयआयटी दिल्लीचे माजी विद्यार्थी आणि ग्लेन या वर्क एआय प्लॅटफॉर्मचे सीईओ अरविंद जैन, टुगेदर एआय या क्लाऊड प्लॅटफॉर्मचे संस्थापक विपुल वेद प्रकाश ही नावे विशेष उल्लेखनीय आहेत.

Indian Origin Success
Editorial : लवंगी मिरची : निसर्ग प्रेरणा

आदर्श हिरेमठ आणि सूर्य मिधा या दोन भारतीय वंशाच्या अमेरिकन तरुणांनी अलीकडेच मार्क झुकरबर्गचा विक्रम मोडला आहे. केवळ 22 व्या वर्षी हे दोघे जगातील सर्वात तरुण ‘सेल्फ-मेड’ अब्जाधीश ठरले असून, त्यांनी 23 व्या वर्षी अब्जाधीश बनलेल्या फेसबुक (आताचा मेटा) संस्थापक झुकरबर्गलाही मागे टाकले आहे. हे दोघे आणि त्यांचा हायस्कूलमधील मित्र ब—ेंडन फूडी यांनी एकत्र येऊन सॅन फ्रान्सिस्कोस्थित ‘मर्कर’ नावाचा एआय रिक्रूटिंग प्लॅटफॉर्म स्थापन केला. या कंपनीने नुकतेच 350 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 2900 कोटी) इतके भांडवल उभारले असून, तिचे सध्याचे मूल्यांकन तब्बल 10 अब्ज डॉलर्सवर (सुमारे 83,000 कोटी) पोहोचले आहे. संस्थापकांपैकी प्रत्येकाकडे सुमारे 22 टक्के हिस्सा असून, त्यांच्या वैयक्तिक मालकीचे मूल्य जवळपास 2 अब्ज डॉलर्स इतके म्हणजेच सुमारे 16,600 कोटी आहे. ही गुंतवणूक अमेरिकेतील फेलिसिस व्हेंचर्स या प्रमुख गुंतवणूक संस्थेच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. फेब्रुवारी महिन्यातील मागील फंडिंग राऊंडच्या तुलनेत यावेळी कंपनीचे मूल्यांकन पाचपट वाढले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news