पहिला चहा | काटकसर केलीच पाहिजे!

पहिला चहा | काटकसर केलीच पाहिजे!
पहिला चहा | काटकसर केलीच पाहिजे!
Published on
Updated on

लहानपणी आपण दिवेलागणीपर्यंत म्हणजे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जी उधळपट्टी करतो त्याचा हिशेब तरुणपणी लागतो असं भाकित आजोबा करून गेले. म्हणून दिवे कमी लावा आणि रॉकेलचाच दिवा पेटवा (त्या काळी) म्हणजे दिवाळं निघणार नाही, हेही पटवून देऊन गेले. खांबावरच्या लाईटी कधी लागतील, याची वाट पाहत त्या दिव्याखाली पोतं टाकून अभ्यास करण्यासाठी पोरांची त्या जागेची अखत्यारी सिद्ध करत चढाओढी लागायच्या. (अर्थात आम्ही काय त्यात नव्हतो बरं.) शिकलेला आणि न शिकलेला काटकसर काय ते जगण्यातून समजून गेला. आता नेत्यांनी ओरडून सांगायची वेळ आली ‘काटकसर करा!’ आई आणि बाप तर वृद्धाश्रमात कोंडले एकेकानी. घरचे धान्य वाचवून वृद्धाश्रमांना देणग्या देऊन आई-बाप पोसले जातात हल्ली. काटकसर कसली छ्या...! आम्ही उधळपट्टी करण्यात माहीर! मुलांचे संगोपन करता येत नाही म्हणून हल्ली डे केअरची सुविधा! याने लेकरं कुठे आहेत, याचा विचार करायची गरज भासत नाही? पण, पालक म्हणून आपणही जागरूक राहायला पाहिजे हेच विसरले आजकालचे आई-बाप. काटकसर कुठून करणार.

आम्ही पोरांना डे केअरला सोडून बिनधास्त चौपाटी, सिनेमा याची मजा घेणार. चौपाटीवाले परप्रांतीय भरगच्च गल्ले घेऊन आपापल्या प्रांताची भर करत आपली काटकसर वाया घालवत आहेत; पण जनता खिल्ली उडवण्यात दंग आणि उडत्या पक्षांना खालून दगड मारण्यात गुंग. (फेसबुक, ट्विटर आणि व्हॉटस्अ‍ॅप माध्यमांतून) अरे हाच दगड पुनः आपल्यावर येतोय, तर सरकार पडण्यापेक्षा आपल्याला कुठेतरी डच्चू मिळणार, याची आम जनतेने खबरदारी घ्यावी. पक्षी (पक्ष) कोणाच्या दगडाने खाली पडेल, अशा माकडचेष्टा करण्यापेक्षा थोडी काटकसर करून पाहावी. आपल्याच घरातील तेल वाचेल. देशाला आणि आपल्याला फायदा म्हणजे सोने पे सुहागा! सोने तर महागाईकडे तोंड करून उभे आहे. त्याला ‘टाटा... बाय बाय’ केले, तर जास्त सुखी होऊ. यावर दुसरा उपाय असेल, तर सुज्ञ लोकांनी तो अडाणीना सांगावा; पण एक सल्ला द्यावा वाटतो की, वर्क फ्रॉम होम सर्वांनीच करावे आणि वृद्धाश्रमवाल्यांनी पण ज्यांचे त्यांचे आई-बाप घरून सांभाळण्यासाठी परत करावेत. डे केअरचा प्रश्नच उरत नाही. हीच नातवंडे वृद्धाश्रम रिटर्न आजी-आजोबा लाडाने सांभाळतील. काटकसर याला म्हणतात.

जुन्या वळणाला हे आपण समजून घ्यावे. (एक हितचिंतक)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news