पहिला चहा | जी-७ आणि मायक्रोफोन

G7 and the Microphone
पहिला चहा | जी-७ आणि मायक्रोफोन
Published on
Updated on

जी-सेव्हन शिखर संमेलन बैठक नुकतीच फ्रान्समध्ये पार पडते. अबब काय ते अवाढव्य स्टेज, नेतेमंडळींची गळाभेट... डोळ्याचं पारणं फिटलं तामझाम पाहून. नेत्यांची एन्ट्री, एन्ट्रीला सॅल्युट मारत पाहुण्यांची सरबराई धडाक्यात सारं जोमात. फोटो शूट करणारे नेम धरून खच्च्याककन नको त्या मोमेंटची शिकार करत होते. व्हायरल थेट इन्स्टा आणि एफबीसारख्या सुशील मीडियावर म्हणजे सोशल हो! लय सोस आमच्या मीडियाला नको त्या बातम्या उठवायला आणि उठाठेवी करायला. जी-सेव्हन बैठकीत बऱ्याच गोष्टी छुप्या मायक्रोफोनने उचकटल्या.

मेलोनी नमोंना आलिंगन देण्यासाठी पुढे झाल्या तेवढ्यात बघा एका पत्रकाराने कॅमेऱ्यावर जम्प मारत तो क्षण पकडला आणि दिला टाकून सुशील मीडियावर. इन्स्टावर! 'आपण सर्वात गाजलेले जोडपे आहोत नमोजी!' अशी मेलोनींची थट्टा वादळ होऊन इन्स्टावर ग्राममध्ये नाही, तर टनात पसरली. नाही म्हटलं सांगावं आपणास. जन हो, आपलापण मीडिया लयच सुशील आहे. वाद नाही. कधी कोपऱ्यातले क्षण चुकूनही चुकवत नाहीत. आता बघा मायक्रोफोनपण अशा ठिकाणी फ्रान्सच्या लोकांनी बसवले की, कोणी खूपच्यात जाऊन हळू आवाजात बोलले, तरी मीडियावर लगेच व्हायरल होईल आणि झालेच तसे.

मेलोनीबाईंना फ्रान्सच्या प्राईम मिनिस्ट्रानी हळूच विचारले. तेपण औपचारिक भेटी-गाठी झाल्यावर. 'मेलोनी आपण सिगारेट ओढता का?' बाजूला घोळका करून अगदीच अनौपचारिक प्रसंग लोक हो. आता अशा कोपरखळ्यापण व्हायरल कराल का फ्रान्सचे मीडियावाले? कळतंय का तुम्हाला कुठंपण वळतात लेकाचे! छ्या!

मेलोनी हळूच म्हणाल्या, 'नाही. आता नाही ओढत.' काय मायक्रोफोनला पण कसं तरी वाटलं ऐकताना. शेवटी तो बिघडला असावा बापडा. पुढचं काही व्हायरल नाही केलं त्याने, त्याअर्थी समजून जावे. तेवढ्यात मेलोनी आणि नमोजींनी जी-२० पासून जपून ठेवलेलं मेलडीचं पाकीट कोपऱ्यात बसून संपवलं असणार, असा अंदाज आपण लावू शकतो. 'चांदी जैसा रंग है तेरा सोने जैसे बाल, एक तू ही धनवान है गोरी बाकी सब कंगाल!' ठोको ताली! सिद्धू वर्जनमध्ये नमोजींनी मनात गुणगुणलेले गाणे मायक्रोफोनने व्हायरल नाही केले. क्या बात. वातावरण थंडगार आणि मीडियावर बातम्यांचा थयथयाट. धन्यवाद बातमीपत्र ऐकल्याबद्दल लोक हो. शब्बा खैर!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news